Solapur station Sakal
सोलापूर

सोलापूर रेल्वे स्थानकाची सुरक्षा रामभरोसे!

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या तोकडी; कडक सुरक्षा यंत्रणा अत्यावश्‍यक

विजय थोरात

सोलापूर - मध्य रेल्वेचे सोलापूर रेल्वे स्थानक दक्षिणेचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. या स्थानकावरून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील मोठी आहे. मागील आठ दिवसांत नागपूर आणि पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्बसदृश वस्तू आढळल्या आहेत, मात्र सुदैवाने या दोन्ही घटनेत कोणताही घातपात झाला नाही. याच पार्श्वभूमीवर सोलापूर रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कारण, सुरक्षेच्या दृष्टीने सद्य:स्थितीत केवळ ३५ ते ४० सीसीटीव्ही कॅमेरे असून, अशा घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेऱ्यांच्या संख्येत वाढ करणे गरजेचे आहे. सीसीटीव्ही कॅमेरे वाढविण्याचा प्रस्ताव आरपीएफकडून देण्यात आला असल्याची माहिती आरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

सोलापूर रेल्वे स्थानक सर्व बाजूंनी खुले असल्याने परिसरात गर्दुले, चोरटे व अनधिकृत विक्रेत्यांचा मुक्त वावर असतो. त्यांच्या आडून एखादा घातपात घडून येऊ शकतो. या ठिकाणी आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिस तैनात असतात. मात्र तरी देखील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. सोलापूर रेल्वे स्थानकावरून दररोज ८० ते ९० गाड्या ये-जा करीत असतात. पाचही फलाटांवर आरपीएफ आणि जीआरपी कर्मचारी असतात. सुरक्षेच्या दृष्टीने स्थानकावर कॅमेरे आहेत, मात्र यातील काही बंद आहेत. याचा भार कर्मचाऱ्यांवर येत आहे. सोलापूर विभागाकडून देण्यात आलेल्या कॅमेऱ्यांच्या प्रस्तावास अद्याप तरी मंजुरी न मिळाल्याने सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे.

स्थानकावर येण्यासाठी अनेक मार्ग आहेत. रामवाडी गोदामाकडून, पार्सल विभागाकडून व प्रवेशद्वारांतून बिनधास्तपणे अनेकांचा मुक्त वावर सुरू असतो. अनेक ठिकाणाच्या भिंतींची उंची कमी असल्याने अनेकजण बिनदिक्कत स्थानकात प्रवेश करतात. याकडे कोणाचेही लक्ष नसल्याने यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे; अन्यथा नागपूर आणि पुणे येथील घटनांची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही.

पुणे, नागपूर स्थानकावर झालेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर स्थानकावरून ये-जा करणाऱ्या सर्व गाड्यांची तपासणी आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांकडून करण्यात येत आहे. त्याचबरोबर स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसंदर्भात रेलटेल कंपनीकडून कॅमेरे बसविण्याचे काम सुरू होईल. तसा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आला आहे.

- श्रेयांश चिंचवाडे, विभागीय सुरक्षा आयुक्त, सोलापूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Bharat Train Food : ‘वंदे भारत रेल्वे’त प्रवाशांना आता स्थानिक पदार्थ दिले जाणार ; रेल्वेमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Messi and Revanth Reddy Football Video : लिओनेल मेस्सीने हैदराबादेत मुख्यमंत्री रेवंत रेड्डींसोबत खेळला फुटबॉल; हजारो चाहत्यांचा उत्साह शिगेला!

PMC Retired Employees : निवृत्तीनंतर दिलासा; २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा मोफत वैद्यकीय उपचार!

Pune Health : कर्करोग निदानासाठी पुणेकरांना मोठा दिलासा; महापालिकेचे पेट स्कॅन सेंटर सुरू; खासगी रुग्णालयांपेक्षा निम्म्या खर्चात!

Soybean MSP : आधारभूत किमत खरेदीत शेतकऱ्यांवर अन्याय नको; आमदार डॉ. संजय कुटे यांनी अधिवेशनात मांडली ठाम भूमिका!

SCROLL FOR NEXT