रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी नेताना पकडला ! Canva
सोलापूर

रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी नेताना पकडला !

रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी नेताना पकडला !

मिलिंद गिरमे

रेशनचा 1100 किलो तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी नेताना पकडल्याने रेशन दुकानातील काळा धंदा पुन्हा एकदा उजेडात आला.

लवंग (सोलापूर) : रास्त भाव दुकानातील 3300 रुपये किमतीचा सुमारे 1100 किलो तांदूळ (Ration Rice) काळ्या बाजारात (Black Market) विक्रीसाठी नेण्यात येत असताना पकडल्याने रेशन दुकानातील काळा धंदा पुन्हा एकदा उजेडात आला आहे. हा तांदूळ काळ्या बाजारात विक्री करताना बिजवडी (ता. माळशिरस) (Malshiras Taluka) येथील ग्रामस्थांनी पकडला. त्यामुळे गरिबांसाठी शासनातर्फे रेशन दुकानातून तांदूळ, गहू व इतर जीवनावश्‍य वस्तू लाभार्थींना न देता रेशन दुकानदारांकडून हे धान्य काळ्या बाजारात विकले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. अशा घटना अनेकवेळा घडूनही प्रशासनाचेही या घटनांकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत.

याबाबत अकलूज पोलिसांकडून (Akluj Police) मिळालेल्या माहितीनुसार, 1 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास रास्त भाव धान्य दुकान परवाना क्रमांक 057/98 चे दुकानदार तानाजी सुखदेव शिंदे (रा. बिजवडी, ता. माळशिरस) हा बिजवडी येथील रेशन दुकानातील तांदळाच्या 50 किलोच्या 22 गोण्या म्हणजे जवळपास 1100 किलो तांदूळ (किंमत 3399 रुपये) शिधा पत्रिका धारकांना वाटण्याऐवजी दोन लाख 50 हजार रुपये किमतीच्या टेम्पोतून काळ्या बाजारात विकण्यासाठी नेत असताना काही ग्रामस्थांना आढळून आला. त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर माळशिरस तहसीलचे पुरवठा निरीक्षक चंद्रशेखर बाळकृष्ण लोखंडे यांनी भेट देऊन खात्री केल्यानंतर बिजवडी येथील रेशन दुकान चालक तानाजी सुखदेव शिंदे (रा. बिजवडी) व वाहन चालक अनिल विजय कचरे (रा. गिरझणी, ता. माळशिरस) यांच्या विरुद्ध जीवनावश्‍यक वस्तू कायदा सन 1955 चे कलम 3 व 7 प्रमाणे अकलूज पोलिसांत कायदेशीर सरकार तर्फे फिर्याद देण्यात आली आहे.

माळशिरस तहसीलचे पुरवठा निरीक्षक चंद्रशेखर लोखंडे यांच्या फिर्यादीवरून अकलूज पोलिसांनी रविवारी (ता. 1) रात्री उशिरा गुन्हा दाखल करून दोघा जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच टेम्पो वाहन नंबर एम एच 45/टी 3264 जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास अकलूज चे पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaywal Acquitted : निलेश घायवळसह सहा आरोपींची निर्दोष मुक्तता; मोका न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

Bank Holiday October 2026: ऑक्टोबरमध्ये बँका 16 दिवस बंद! महाराष्ट्रात किती दिवस सुट्टी? पाहा RBIची संपूर्ण यादी

Chiplun Municipality : चिपळूण नगरपालिकेत नोकरीसाठी 15 लाखांची मागणी? सत्ताधारी नगरसेवकाच्या गंभीर आरोपामुळे खळबळ, प्रशासनाचे स्पष्टीकरण

‘या’ राशींचे लोक असतात खूप जास्त इमोशनल, भावनेच्या भरात घेतात निर्णय, नंतर होतो पश्चात्ताप; त्यांच्या या स्वभावाचा फायदा घेतात लोक

Marathi News Live Updates: मुंबई-अहमदाबाद मार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT