दोन सत्रात भरणार शाळा Esakal
सोलापूर

शिक्षणाधिकाऱ्यांची माहिती! उन्हामुळे सकाळी भरणार शाळा

उन्हाचा कडाका वाढत असल्याने आणि दहावी- बारावीच्या परीक्षांच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील झेडपीच्या शाळा सकाळच्या सत्रात भरतील, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी दिली.

तात्या लांडगे

जिल्ह्यात झेडपीच्या दोन हजार 796 शाळा आहेत. त्या शाळांमध्ये एक लाख 50 हजार 348 मुले प्रवेशित आहेत. कोरोनाच्या संकटामुळे यंदा शाळा खूपच विलंबाने सुरू झाल्या आहेत. 1 फेब्रुवारीपासून शाळा सुरू झाल्या, परंतु आता उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढू लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर काही पालकांनी मुलांना शाळेत पाठविणेच बंद केल्याचे चित्र आहे. विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होणार नाही, त्यांची गैरहजेरी वाढणार नाही, याची खबरदारी घेऊन आता पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा (जिल्हा परिषद) सकाळच्या सत्रात भरविली जाणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षण विभागाचे सभापती, समिती त्यासंबंधीचा अंतिम निर्णय दोन-तीन दिवसांत घेतील. माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यासंदर्भात काहीच सांगितलेले नाही. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे पेपर सकाळी साडेदहा वाजताच सुरू होणार असल्याने पाचवी ते नववीच्या मुलांच्या शाळांबाबत ते काय निर्णय घेतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

दरवर्षी उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर मार्च महिन्यात मुलांची शाळा सकाळच्या सत्रात भरविली जाते. आता उन्ह वाढू लागले असून शाळेची वेळ सकाळी करण्यासंदर्भात 3 मार्च रोजी शिक्षण समितीत अंतिम निर्णय होईल.
- किरण लोहार, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर जिल्हा परिषद

आरटीई प्रवेशासाठी वय निश्‍चित
चालू शैक्षणिक वर्षात "आरटीई'अंतर्गत 25 टक्‍के प्रवेश सवलतीत दिले जातात. त्यासाठी बालकांचे किमान वय निश्‍चित करण्यात आले आहे. शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय निश्‍चित करण्यासाठी 18 सप्टेंबर 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार मानीव दिनांक 31 डिसेंबर निश्‍चित करण्यात आला आहे. त्यामागे जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये हा हेतू आहे. त्यानुसार प्ले-ग्रुप, नर्सरीसाठी 1 जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2019 (चार वर्षे पाच महिने 30 दिवस), ज्युनियर केजीसाठी 1 जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018 (पाच वर्षे पाच महिने 30 दिवस) आणि सिनियर केजीसाठी 1 जुलै 2016 ते 31 डिसेंबर 2017 (सहा वर्षे पाच महिने 30 दिवस) आणि पहिलीसाठी 1 जुलै 2015 ते 31 डिसेंबर 2016 (सात वर्षे पाच महिने 30 दिवस) अशी वयोमर्यादा निश्‍चित करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

England vs Argentina: ७ मिनिटांत मॅच फिरवली! अर्जेंटिनाची फायनलमध्ये धडक; इंग्लंडचे ६० वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न भंगले

भारतावर शंभर टक्के आयात शुल्क लावण्याचं अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक; रशियाच्या तेल खरेदीवरुन पाच देशांवर संकट?

Kannad Water Supply Scheme : कन्नड शहरासाठी ५६ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर! ​आमदार संजना जाधव यांच्या पाठपुराव्याला यश

Tukaram Mundhe: सिया गोयलच्या कुटुंबियांना तुकाराम मुंढेंच्या पथकाचा दणका; पुण्यातलं दुकान केलं सील, आठ लाखांचा माल जप्त

Mangalwedha News : स्व. नागनाथ आण्णाचा पाण्याचा लढा पुढे कायम ठेवू; प्रा. शिवाजीराव काळुंगे

SCROLL FOR NEXT