विद्यापीठाकडून प्रवेश अन्‌ परीक्षा शुल्कवाढ नाहीच! Esakal
सोलापूर

विद्यापीठाकडून प्रवेश अन्‌ परीक्षा शुल्कवाढ नाहीच!

प्रवेश अन्‌ परीक्षा शुल्कवाढ नाहीच! विद्यापीठाकडून विद्यार्थीहिताचा निर्णय

तात्या लांडगे

सोलापूर विद्यापीठांतर्गत पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश व परीक्षा शुल्कात मागील पाच वर्षांत एक रुपयाची देखील वाढ केलेली नाही.

सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठांतर्गत (Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University) पदवी व पदव्युत्तर शिक्षण (Education) घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश व परीक्षा शुल्कात मागील पाच वर्षांत एक रुपयाची देखील वाढ केलेली नाही. कोरोनासह अन्य अडचणींमुळे विद्यापीठाने विद्यार्थीहिताचा निर्णय घेतला आहे. कोरोना काळात महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांकडून सायकल स्टॅंड, क्रीडांगण देखभाल- दुरुस्ती, ग्रंथालय शुल्कासह अन्य काही बाबींवरील शुल्क परत केले. यावर्षी जवळपास 30 टक्‍के शुल्क घेतलेच नाही.

दर तीन वर्षातून एकदा किमान 10 टक्‍के शुल्क वाढविले जाते. सेवानिवृत्त न्यायाधीश, कुलगुरूंच्या अध्यक्षतेखालील शुल्क समिती त्यासंबंधीचा निर्णय घेते. मात्र, मागील पाच वर्षांत विद्यार्थ्यांच्या अडचणींमुळे विद्यापीठाने कोणतेही शुल्क वाढविलेले नाही, असे कुलसचिवांनी सांगितले. दरम्यान, बुधवारपासून (ता. 20) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे ऑफलाइन वर्ग सुरू होणार आहेत. परंतु, नियमित क्‍लासेस सुरू राहणार नसून, केवळ प्रात्यक्षिकाचे काम ऑफलाइन पद्धतीने चालू ठेवले जाणार आहे. कोरोनाची स्थिती अजूनही पूर्णपणे सुधारली नसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याला पहिले प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे प्रात्यक्षिकासाठी उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचल्याचे प्रमाणपत्र जवळ ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

कोरोनामुळे मागील दोन वर्षांत आणि त्यापूर्वी तीन वर्षांत विद्यापीठाने ना प्रवेश शुल्क अन्‌ ना परीक्षा शुल्कात वाढ केली. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थीहिताचा निर्णय विद्यापीठाने घेतल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

- प्रा. डॉ. सुरेश पवार, प्रभारी कुलसचिव

नोव्हेंबरमध्ये होणारी परीक्षा ऑफलाइन?

द्वितीय व अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची सत्र परीक्षा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अथवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचे नियोजन पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून केले जात आहे. दरम्यान, ही परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन होणार, याचा अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, ऑनलाइन परीक्षेतून विद्यार्थ्यांच्या क्षमतांचे मोजमाप पारदर्शकपणे होत नाही. त्यामुळे पदवी अथवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते विद्यार्थी बाहेरील स्पर्धेत टिकतील का, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. त्यामुळे आगामी सत्र परीक्षा कोरोनाची परिस्थिती पाहून ऑफलाइन पद्धतीनेच होईल, अशी माहिती विद्यापीठातील विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT