सोलापूर : उजनी धरण sakal
सोलापूर

Ujani Dam Water Level: उजनीतील पाणी पिण्यासाठीच राखीव! पावसाचा अंदाज घेऊन बॅकवॉटरच्या शेतीच्या पाण्यावर येणार निर्बंध

पावसाळा सुरु होऊन महिना होतोय, तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. उजनीची पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत आहे. आता उजनीतील पाणी फक्त पिण्यासाठीच राखीव ठेवले जाणार आहे. पावसाचा अंदाज घेऊन बॅक वॉटरवरील कृषीपंपाचा पाणीपुरवठा आगामी काळात बंद होऊ शकतो.

तात्या लांडगे

Solapur Irrigation News : पावसाळा सुरु होऊन महिना होतोय, तरीदेखील जिल्ह्यात तथा उजनी धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे उजनीची पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत आहे. आता उजनीतील पाणी फक्त पिण्यासाठीच राखीव ठेवले जाणार आहे. पावसाचा अंदाज घेऊन बॅक वॉटरवरील कृषीपंपाचा पाणीपुरवठा आगामी काळात बंद होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मागच्या वर्षी या दिवसात पुण्यासह धरण क्षेत्रातील पावसाचे पाणी धरणात जमा होत होते. पण, यंदा खूपच भयावह परिस्थिती आहे. पेरण्या खोळंबल्या असून उजनीत सध्या अडीच हजाराचा विसर्ग येत आहे. तो विसर्ग दौंडचा नसून स्थानिक परिसरातील पावसाचे पाणी आहे.

खडकवासला धरण अजूनही ४८ टक्क्यांवरच थांबले असल्याने दौंडवरून धरणात काहीच विसर्ग येत नाही. दरम्यान, उजनी धरणाच्या बॅक वॉटरवरील शेतीला दरमहा साधारणतः एक टीएमसी पाणी घेतले जाते. बॅक वॉटरवर ३४ हजार ८०० हेक्टर क्षेत्र आहे.

सध्या धाराशिव, नगर, इंदापूर, सोलापूरसह काही ‘एमआयडीसीं’चा पाणीपुरवठा सुरु आहे. पण, आणखी १५-२० दिवस पाऊस न झाल्यास धरणातील पाणी केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवले जाणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिली. उजनी धरण सध्या मायनस ३५.६९ टक्क्यावर आहे.

‘औज’मधील पाणी ऑगस्टअखेर संपणार

सोलापूर शहरासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्यात उजनीतून नुकतेच पाणी सोडण्यात आले आहे. ७ जुलैला ते पाणी बंद केले असून औजमधील पाणी साधारणतः: ४० दिवसांपर्यंत पुरते. पण, या काळात समाधानकारक पाऊस न झाल्यास ऑगस्टअखेर पुन्हा एकदा नदीद्वारे ‘औज’मध्ये पाणी सोडावे लागू शकते. त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊन लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधिकारी काटेकोर नियोजन करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Real Estate Development : २०१६ ते २०२६ दरम्यान पिंपरी चिंचवडचे चित्र बदलले; शेतजमिनी कमी होऊन टोलेजंग इमारतींची संख्या वाढण्यामागे काय?

Shankar Maharaj Math : धनकवडीतील शंकर महाराज मठाच्या अन्नछत्राला एफडीएचा दणका; परवाना मिळेपर्यंत व्यवसाय बंद

Tata Group: टाटा समूहात खळबळ! रतन टाटा यांचे सख्खे भाऊ जिमी टाटा यांचे नोएल टाटांवर गंभीर आरोप; म्हणाले...

IPL Retaintion झालं, आता लिलावापूर्वी कोणत्या संघाकडे किती पैसे अन् खेळाडूंची जागा शिल्लक? पाहा यादी

Pimpri Cyber Police : सायबर गुन्हेगारांना १२ हजार बनावट सिमकार्डचा पुरवठा; पिंपरी पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT