sugar factories sakal
सोलापूर

'चिमणी'साठी तरुणाने जीव घातला धोक्‍यात!

एक तरुण जीव धोक्‍यात घालून महावितरणच्या धोकादायक टॉवरवर चढला.

तात्या लांडगे

एक तरुण जीव धोक्‍यात घालून महावितरणच्या धोकादायक टॉवरवर चढला.

सोलापूर : श्री सिध्देश्‍वर साखर कारखान्याचे वीज कनेक्‍शन तोडल्यानंतर मोठे आर्थिक नुकसान होईल. कारखाना बंद ठेवावा लागेल, ऊस उत्पादक अडचणीत येतील या हेतूने महावितरणच्या अधिकाऱ्यांना नागरिकांनी तीव्र विरोध केला. एक तरुण जीव धोक्‍यात घालून महावितरणच्या धोकादायक टॉवरवर चढला. नागनाथ चौधरी या तरूणाविरुध्द एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तत्पूर्वी, कारवाई कराल तर तारेला धरेन, असा इशारा त्याने दिला होता. उपस्थित नागरिकांनीही कारवाईला विरोध केल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांना कारवाई न करताच परतावे लागले.

जलसंपदा विभागाने होटगी तलवातून कारखान्याला होणारा पाणी पुरवठा बंद करून पंप हाऊस सिल करून टाकले आहे. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानुसार महावितरणचे अधिकारी कारखान्याची वीज तोडण्यासाठी गेले होते. तत्पूर्वी, कारखान्यावर ऊस उत्पादक शेतकरी, कामगारांच्या पत्नी, मुले, कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या समर्थकांनी त्याठिकाणी मोठी गर्दी केली होती. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पवार हे त्यांच्या लवाजम्यासह त्याठिकाणी होते. परंतु, नागरिकांचा आक्रोश पाहून त्यांनीही काहीच कारवाई केली नाही. त्यावेळी उपस्थितांनी "सिध्देश्‍वर महाराज की जय' अशी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता. दरम्यान, तुम्ही कारवाई करताना त्या तरुणाला काही झाल्यास त्याल सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल, असा इशारा उपस्थितांनी महावितरण व पोलिस अधिकाऱ्यांना दिला. त्यामुळे कारवाईविनाच त्यांना परतावे लागले. चार वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनीही कारखान्यावरील शेतकऱ्यांचा विरोध पाहून चिमणी पाडकामाची कारवाई मागे घेतली होती. तोच अनुभव काल (शनिवारी) पुन्हा आला.

दिवसभरातील घडामोडी...

- प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पत्रानुसार कारखान्याला दिलेली मुदत शनिवारी संपली

- वीज कनेक्‍शन तोडण्यासाठी महावितरण अधिकाऱ्यांनी सकाळी केली होती पाहणी

- दुपारी चार वाजता पोलिस बंदोबस्त घेऊन कारखान्यावर पोहचले महावितरणचे अधिकारी

- महावितरणच्या डेपोजवळ हजारोंची गर्दी; एका तरुणाने टॉवरवर चढून दिला आत्मदहनाचा इशारा

- नागरिकांची मोठी गर्दी पाहून पोलिसही बसले गप्प; कारवाई न करण्याच्या अटीवर तरुण उतरला खाली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT