Theft of 298 wine bottles from a hotel in Solapur 
सोलापूर

दारूबंदी सहन होईना! हॉटेलचे शटर तोडून लंपास केल्या दारूच्या 298 बाटल्या

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : विजयपूर रोडवरील सुरेगाव परिसरातील निशा हॉटेलला दारूबंदी खात्याच्या अधिकाऱ्यांनी सिलबंद केले होते. मात्र, चोरट्याने सोमवारी (ता. 12) मध्यरात्रीच्या सुमारास हॉटेलच्या शटरचे कुलूप तोडून 62 हजार 965 रुपयांच्या 298 देशी-विदेशी दारूच्या बाटल्या चोरून नेले आहेत.
चोरट्यांनी हॉटेलच्या परिसरात कोणी नसल्याचा फायदा घेत हॉटेलचे पुढील व मागील शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर दारूबंदी अधिकाऱ्याने सीलबंद केलेल्या शटरचे कुलूपही तोडले. हॉटेलच्या तर घरांमध्ये ठेवलेल्या दारूच्या बाटल्या चोरून नेल्या. सच्चिदानंद विष्णू सावंत (सलगरवाडी, डोणगाव रोड) यांनी याबाबत विजापूर नाका पोलीसांत फिर्यादी दिली आहे. सोलापुरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शहरातील दारूबंदी सुरू न करण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच असे प्रकार होऊ लागल्याची चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे दारू विक्री सुरू केल्यास सोशल डिस्टन्ससिंगचा फज आवडेल म्हणून लोक डाऊन संपेपर्यंत दारू विक्री सुरू होणार नाही, असे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

प्रतिबंधित परिसरातील 53 जणांविरुद्ध गुन्हे

सोलापूर : ज्या भागात कोरोना रुग्ण सापडला आहे, तो भाग पोलिसांनी प्रतिबंधित केला आहे. या भागातील नागरिकांना दुसऱ्या परिसरात येण्यास बंदी असतानाही नियमांचे उल्लंघन करून बाहेर जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या 53 जणांविरुद्ध पोलिसांनी मंगळवारी (ता. 12) गुन्हे दाखल केले.
मिलिंद नगर, बुधवार पेठ, पोटफाडी चौक, न्यू पच्छा पेठ, अशोक चौक, मोदीखाना, कुमठा नाका, अलकुंटे चौक, बापुजी नगर, शास्त्री नगर, हुच्चेश्वर नगर, मराठा वस्ती, मधला मारुती, मंगळवार पेठ पोलीस चौकी प्रतिबंधित क्षेत्रातून दुसऱ्या परिसरात जाण्याच्या तयारीत असलेल्या नागरिकांना पोलिसांनी थांबवले. आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या उल्लंघनप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. फौजदार चावडी पोलीसांनी व एमआयडीसी पोलिसांनी प्रत्येकी एक, जेलरोड पोलिसांनी 13, जोडभावी पोलिसांनी चार गुन्हे दाखल केले आहेत. तत्पूर्वी, 11 व 12 मे या कालावधीत एक हजार 615 वाहने चेक केली.  74 वाहनचालकाने वृद्ध मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केले असून 228 जणांना तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सगळं सोडून द्यायचा विचार होता पण...; सुटकेनंतर संतोष पंडित काय म्हणाले? तुरुंगातल्या व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह

Panvel News: पनवेलमध्ये वाहतुकीत मोठे बदल! गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांसाठी प्रशासनाचे कडक पाऊल

Lalbaugcha Raja: सोनं,चांदी, डॉलर... 'लालबागचा राजा'च्या चरणी भरभरुन दान, ३ दिवसांत कोट्यवधींची देणगी; आकडा पाहून व्हाल थक्क!

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

तेजश्री प्रधानच्या मनात नेमकं काय? 'तो माझ्यासाठी खूप खास…' म्हणत व्यक्त केल्या भावना

SCROLL FOR NEXT