सोलापूर

अबब..! या जिल्ह्यात 27 जातींचे साप आढळतात 

प्रशांत देशपांडे

सोलापूर : जगभरात सापांच्या सुमारे अडीच हजार जाती आहेत. त्यात भारतात 340 जाती आढळतात. त्यांपैकी फक्त 69 जाती या विषारी आहेत. महाराष्ट्रात सापांच्या सुमारे 52 जाती असून त्यापैकी 12 जाती विषारी आहेत. यापैकी सोलापूर जिल्ह्यात साधारण 27 जातींचे साप सापडतात, त्यात पाच जातीचे विषारी आहेत. साप प्रामुख्याने उबदार हवामानात आणि गवताळ व सुपीक प्रदेशात आढळतात. साप जमिनीवर तसेच पाण्यातही आढळतात. 

सोलापूर जिल्ह्यात विषारी जातीचे चार प्रमुख साप आढळतात. परंतु, पाचवा साप हा पोळा दुर्मिळ आहे. बाकी चार सर्वत्र आढळतात. नाग, मण्यार, घोणस, फुरसे तसेच अजगर, तस्कर, कवड्या, पानदिवड, धामण, गवत्या, धुळ नागीन, डुरक्‍या घोणस, मांडोळ, कुकरी, पिवळ्या ठिपक्‍यांचा कवड्या, बिन विषारी जातीचे साप आढळतात. तसेच, निमविषारी (अर्धी विषारी) साप म्हणजे मांजरय्या, हरणटोळ ही आढळतात. सोलापूर शहरामधून अनेक राष्ट्रीय महामार्ग गेल्याने काही परराज्यातील साप आढळून आले होते. उडता सोनसर्प, चापडा, मालबर चापडा, हरणटोळ हे साप अढळतात. 

सर्पदंश टाळा आणि सापांविषयी माहिती जाणून घ्या. सापांची विषारी आणि बिनविषारी वर्गवारी होऊ शकते. बिनविषारी साप जास्त संख्येने आहेत ते चावले तरी माणूस मरत नाही. साधे टीटीचे इंजेक्‍शन घेतले तरी पुरेसे (अजगर, धामण, तस्कर, गवत्या, वाळा, दिवड, कवड्या, नानेटी, मांडोळ -बिन विषारी) विषारी साप चावल्यास योग्य उपचार न मिळाल्यास माणूस मरतो. प्रामुख्याने आपल्या भागात चार विषारी साप सापडतात. त्यामुळे त्यांची माहिती जाणून घ्या, त्यांच्यापासून दूर रहा. 

विषारी साप कसे ओळखणार? 
- नाग (नागराज) : जो फना काढून उभा राहतो तो नाग, जोरात फुत्कार, फुस्स असा सारखा आवाज आल्यास जवळ नाग आहे असे समजावे. 
- मण्यार : काळपट नीळसर रंग, अंगावर पांढरे पट्टे, शेपटीकडे अधिक डोक्‍याकडे कमी होत जातात हा साप इतर सापांना खातात. 
- फुरसे : फूटपट्टी एवढी लांबी, शरीरावर वेलबट्टी सारखे नक्षीकाम, डोक्‍यावर बाणासारखी खूण, दंश करताना जिलेबीसारखा आकार करून शरीर एकमेकावर घासतो आणि करवतीसारखा करकर आवाज करतो. 
- घोणस : हा साप कुकरच्या शिट्टीचा आवाज काढतो, अंगावर साखळीसारखे काळ्या रंगाचे टिपके असणाऱ्या रेषा असतात, डोक्‍यावर इंग्रजी व्ही अक्षर असते. 

इतर विषारी सर्प-समुद्री साप, चापडा 
वरील विषारी साप चावल्यास त्वरित सरकारी मोठ्या दवाखान्यात घेऊन जा, नेत असताना प्रथमोपचार करा. 
दंशावरच्या बाजूस आवळपट्टी बांधा, हृदयाच्या दिशेने, आवळपट्टीमध्ये एक बोट जाईल एवढी घट्ट बांधा, ती अधूनमधून सैल करून पुन्हा बांधा, डोक्‍याला साप चावल्यावर गळ्याला आवळपट्टी बांधू नका. माहीत नसल्यास जखमेवर चिरा देऊ नका. सिनेमात दाखवतात त्या पद्धतीने तोंडाने विष शोषण करू नका नाहीतर जीव गमवावा लागेल. 


दूध हे सापाचे अन्न नाही. यामुळे त्याला नागपंचमीला लगेच दूध पाजण्यास जाऊ नका. साप हा शाकाहारी नाही, त्याला श्रावण वैगरे काही नसतो, साप शुद्ध मांसाहारी आहे. त्यामुळेच तो आपल्या घरी उंदीर, पाल, कीटक खाण्यासाठी येतो. सापाला लांबचे दिसत नाही, जवळचे दिसते. तरी ब्लॅक अँड व्हाइटमध्ये दिसते. फोटोच्या निगेटिव्हसारखे. साप घरात येऊ नये असे वाटत असेल तर उंदीर, पाल, कीटकांचा बंदोबस्त करा. घराच्या बागेतील डबके, भिंतीच्या चिरा, दरवाजा फटी बुजवा. 

सापाबद्दल या अंधश्रद्धा 

  • सापाच्या डोक्‍यावर मणी असतो 
  •  सापाला केस असतात 
  •  साप धनाचे रक्षण करतो 
  •  साप पाठलाग करतो 
  •  साप पुंगीवर नाचतो 
  •  साप बदला घेतो 
  •  साप दूध पितो 
  •  विशिष्ठ सापामुळे धन लाभ होतो. 

पावसाळ्यात शेतात काम करणाऱ्या गरीब, शेतकरी, कष्टकरी लोकांना जास्त प्रमाणात साप चावतात. त्यामुळे सापाविषयी आणि त्यावर उपचाराची माहिती त्यांच्यापर्यंत पोचवणे फार गरजेचे आहे. 

सगळेच साप विषारी नसतात, 
साप दिसला की यमराजच आठवतात. कारण साप चावला की काही क्षणात माणूस दगावतो अगदी हेच आपल्या मनावर बिंबवले आहे. 
पण ते नक्कीच सत्य नाही. सगळेच साप विषारी नसतात, विषारी साप चावला तर माणूस दगावत नाही. साप या निष्पाप जीवाविषयी गैरसमज आणि त्यांचा भडीमार या प्राण्यांचा तिरस्काराला कारणीभूत आहे. गेल्या तीन वर्षांत 700 ते 800 साधारण साप पकडले आहेत. 
- सोमनाथ बनसोडे, 
सर्पमित्र, सोलापूर 

सहा फुटाचा किंग कोब्रा पकडला 
मी गेल्या तीन वर्षांत 800 पेक्षा जास्त साप पकडले आहेत. तसेच 11 फुटाची धामिण, सहा फुटाचा किंग कोब्रा सुद्धा पकडला आहे. दरवर्षी सर्पदंश झालेल्या चार ते पाच नागरिकांचे प्राण वाचवतो. 
- अली मुजावर, सर्पमित्र, मंद्रूप 

सर्पदंशाने मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण कमी 
सोलापूर जिल्ह्यात सर्पदंशाने मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण गेल्या तीन वर्षांत एक ते दोन टक्के इतके आहे. आता पावसाळा तोंडावर आला आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणवर साप बाहेर पडत असतात. सर्पदंश झाल्यावर लवकरात लवकर दवाखान्यात जाऊन उपचार करून घ्यावेत. 
- डॉ. विठ्ठल धडके, 
प्राध्यापक, औषध विभाग, सिव्हिल हॉस्पिटल 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News Updates : दक्षिण मुंबईतील गणेशोत्सव मंडळांची बैठक सुरु, अडचणींवर व नियोजनाबाबत होणार चर्चा

Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! काकाच्या मुलीवर प्रेम जडलं; रागात गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांना नांगराला जुंपलं, व्हिडिओ व्हायरल

८ चेंडूंत ६ विकेट्स.. पाच त्रिफळाचीत ! Kishor Kumar Sadhak ने इंग्लंडमध्ये सलग दोन षटकांत घेतल्या दोन Hat-Tricks

Parenting tips: पेराल ते उगवेल, आई वडिलांकडून अशा प्रकारे सवयी शिकतात मुलं

SCROLL FOR NEXT