There are 488 ICU beds in Solapur city 
सोलापूर

शहरात अवघे 488 आयसीयु बेड ! एकूण बेडची संख्या जाणून घ्या

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहरातील रूग्णांच्या तुलनेत शासकीय रुग्णालयांमधील बेड कमी पडू लागले आहेत. त्यामुळे आता सात रस्ता येथील प्राईड हॉस्पिटल, रघोजी क्‍लिनिक, काझी हॉस्पिटल या रुग्णालयांमध्ये उपचाराची सोय करून दिली जाणार आहे. तसेच पोलिस प्रशिक्षण केंद्र आणि भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात बेड उपलब्ध केले जाणार आहेत. तर सोलापूर विद्यापीठात कोविड केअर सेंटर सुरु करण्यात येणार आहे.

सोलापूर शहरातील खासगी व शासकीय एकूण 335 रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने महापालिकेचे बॉईज हॉस्पिटल, वाडीया हॉस्पिटल, श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, रेल्वे हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहेत. याशिवाय अश्‍विनी हॉस्पिटल, सीएनएस हॉस्पिटल, मार्कंडेय हॉस्पिटल, यशोधरा, स्पर्श निरो हॉस्पिटल, सिटी हॉस्पिटल, बलवंत इन्स्टिट्यूट ऑफ न्युरो हॉस्पिटल, एस. पी. इन्स्टिट्यूट ऑफ न्युरो सायन्स हॉस्पिटल आणि एस. एस. बलदवा हॉस्पिटलमध्येही रुग्णांवर उपचार सुरु आहेत. या 11 रुग्णालयांमध्ये एक हजार 155 बेड आहेत.

शहरातील एकूण 335 रुग्णालयांमध्ये कोरोना बाधितांवर उपचार सुरू असून त्याठिकाणी सहा हजार 44 बेड उपलब्ध आहेत. त्यापैकी 488 आयसीयु बेड असून 191 बेडसाठी व्हेंटिलेटरची सुविधा आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने आता एक हजार 50 बेड वाढविण्यात येणार आहेत. त्यामध्ये भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात 460, पोलिस प्रशिक्षण केंद्रात 440, प्राईड, रघोजी आणि काझी हॉस्पिटलमध्ये एकूण 150 बेड वाढविण्याचे नियोजन असल्याची माहिती आरोग्याधिकारी डॉ. बिरूदेव दुधभाते यांनी दिली.

शहरातील कोरोना रुग्णांसाठीचे बेड

एकूण कोरोना बेड - 6,044
आयसीयू बेड - 488
व्हेंटिलेटर बेड - 191
बेडची नियोजित वाढ - 1,050

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Endlife : साहिल वाकोडे प्रकरण : तीन दिवसांच्या आंदोलनानंतर आयआयटी बॉम्बे झुकले; विद्यार्थ्यांच्या १८ मागण्या केल्या मान्य

Pune Metro: आयटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! हिंजवडी मेट्रो स्थानकांना कंपन्यांची कार्यालये थेट जोडणार; पादचारी पुलांची तयारी

रागात पाहिल्याने छातीवर सपासप वार..., मुंबईत गणेशोत्सवात रक्तरंजित थरार; 7 जणांकडून मंडळाच्या अध्यक्षाची हत्या

World Alzheimer Day 2026: साठी ओलांडलीय? मग अल्झायमरची ‘ही’ लक्षणं तुम्हाला माहित असायलाच हवीत!

Marathi News Live Updates : येत्या महिनाभरात मुंबई महानगरपालिकेच्या 800 अभियंत्यांची होणार उचलबांगडी, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT