Principal Canva
सोलापूर

सोलापूर जिल्ह्यातील 199 शाळा मुख्याध्यापकांविनाच !

जिल्ह्यातील 199 शाळा मुख्याध्यापकांविना ! आंतरजिल्हा बदलीतून येतील 627 शिक्षक

तात्या लांडगे

मराठी माध्यमातील उपशिक्षकांची 548 पदे रिक्‍त असून उर्दू व कन्नड माध्यमातील 79 उपशिक्षकांची पदेही भरलेली नाहीत.

सोलापूर : शालेय शिक्षण विभागातील (Department of School Education) पदभरती बंद असल्याने जिल्ह्यातील 187 मराठी, एक कन्नड तर 11 उर्दू शाळा मुख्याध्यापकांविनाच सुरू आहेत. दुसरीकडे, मराठी माध्यमातील उपशिक्षकांची 548 पदे रिक्‍त असून उर्दू व कन्नड माध्यमातील 79 उपशिक्षकांची पदेही भरलेली नाहीत. प्राथमिक शिक्षण विभागाने आंतरजिल्हा बदलीतून त्या रिक्‍त जागा भरण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे. शाळा बंद असल्याने लांबणीवर पडलेला आंतरजिल्हा बदलीचा प्रश्‍न पुढील महिन्यात मार्गी लागण्याची शक्‍यता आहे. (There are vacancies for headmasters in 199 schools in Solapur district)

कोरोनामुळे (Covid-19) सध्या "शाळा बंद अन्‌ ऑनलाइन शिक्षण सुरू' या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. मात्र, ऑनलाइन शिक्षणातून त्यांची शिक्षणाची गोडी कायम राहील, याची शाश्‍वती देणे कठीण आहे. त्यातच अनेकांकडे स्मार्टफोन नाहीत, त्यामुळे असे विद्यार्थी शिक्षणापासून दूर जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (Zilla Parishad Chief Executive Officer Dilip Swamy) यांनी शिक्षकांच्या माध्यमातून कोरोनामुक्‍त गावांमध्ये गृहभेटी, झाडाखालची शाळा, समाजमंदिर तथा मंदिरांमध्ये ऑफलाइन वर्ग भरवून स्मार्टफोन नसलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. मात्र, शालेय शिक्षण विभागातील रिक्‍त पदांमुळे त्यासाठीही अडचणी येत आहेत. रिक्‍त पदांवर बाहेरील जिल्ह्यातून शिक्षक येतील, अशी अपेक्षा आहे. मे-जूनमध्ये आंतरजिल्हा बदलीचा शिक्षकांचा प्रश्‍न मार्गी लागेल, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले होते. परंतु, जुलै उजाडला तरीही, काहीच कार्यवाही झालेली नाही.

रिक्‍त पदांमुळे शिक्षणात अडचणी निश्‍चित आहेत. तरीही, उपलब्ध मनुष्यबळातून अध्यापनाचे कामकाज पाहिले जात आहे. आता आंतरजिल्हा बदलीतून किती पदे भरता येतील, याची माहिती संकलित केली आहे. परंतु, त्यासंदर्भात अजून निर्णय झालेला नाही.

- संजयकुमार राठोड, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

अशी आहेत रिक्‍त पदे...

  • मुख्याध्यापक : 199

  • उपशिक्षक : 627

  • विस्ताराधिकारी : 11

  • केंद्रप्रमुख : 154

सरळसेवा भरती नसल्याने केंद्रप्रमुख मिळेनात

राज्य शासनाच्या नव्या धोरणानुसार केंद्रप्रमुखांची पदोन्नतीवर 30 टक्‍के पदे भरली जातात. तर सरळसेवेतून 40 टक्‍के आणि 30 टक्‍के पदे स्पर्धा परीक्षेतून भरली जातात. मात्र, स्पर्धा परीक्षा व सरळसेवेची परीक्षाच मागील दीड वर्षापासून झालेली नाही. त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात सरळसेवेतून भरती होणाऱ्या 80 तर स्पर्धा परीक्षेतून येणाऱ्या 59 केंद्रप्रमुखांची पदे सद्य:स्थितीत रिक्‍त असल्याचे समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: 19 व्या वर्षी साक्षी राहिंज इंडियन एअर फोर्समध्ये; पिंपरणेच्या लेकीची आकाशाला गवसणी, स्वप्न उतरवलं सत्यात!

Kolhapur 60 kg Silver Robbery : थरारक! आरामबसवर दरोडा, ६० किलो चांदी लुटली; कोल्हापुरातील घटना, बस थेट पोलिस ठाण्यात...

Land Acquisition : पुरंदर विमानतळासाठी नववर्षात भूसंपादन; जमीन परतावा, दर वाढवून देण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता

BMC Election : देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेवर 'वंचित'ची नजर; '200 उमेदवार उतरवणार रिंगणात'; प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : ठाकरे बंधूंच्या युतीची आज घोषणा; मुंबईच्या राजकारणाला मिळणार नवे वळण

SCROLL FOR NEXT