Wild Animals 
सोलापूर

महूद परिसरात अज्ञात जंगली हिंस्र प्राण्याचा वावर ! शेळ्यांवर हल्ला झाल्याने स्थानिकांमध्ये भीती 

उमेश महाजन

महूद (सोलापूर) : सांगोला तालुक्‍यातील महूदच्या उत्तरेला असणाऱ्या वाडी-वस्ती परिसरात गेल्या आठवड्यात नागरिकांना जंगली हिंस्र प्राणी दिसला होता. हा अज्ञात हिंस्र प्राणी अजूनही याच भागात लपून बसला असून, तो अधून- मधून शेळ्यांवर हल्ला करत आहे. त्याच्या हल्ल्यात आतापर्यंत येथील काही शेळ्या, बोकड ठार झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. 

गेल्या आठवड्यात शनिवारी महूद परिसरात बिबट्या दिसल्याच्या अफवेने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. तेव्हा वनाधिकारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ या परिसरात येऊन पाहणी केली. त्याच्या पायाच्या ठशांवरून व प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितलेल्या माहितीवरून तो बिबट्या नसून तरस किंवा इतर प्रकारचा जंगली प्राणी असल्याचे सांगितले होते. महूदच्या उत्तरेला असणाऱ्या ठोंबरेवाडी, कोळेकरवस्ती, येडगेवाडी, कारंडेवाडी (महिम) या भागात हा जंगली प्राणी दिसला होता. याबाबत नागरिकांनी तांबूस रंगाचा प्राणी पाहिल्याचे सांगितले. वन कर्मचाऱ्यांनी त्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला. या परिसरातील काही उभ्या पिकांमध्ये व उसामध्येही या प्राण्याचा शोध घेण्यात आला, मात्र तो कोठेही आढळून आला नाही. 

महूदच्या उत्तरेकडील भागात, वाडी-वस्ती परिसरात उसाचे व इतर पिकांचे क्षेत्र जास्त आहे. काही ठिकाणी दाट झाडी सुद्धा आहेत तर काही ठिकाणी मोकळ्या माळरानाचा परिसरही मोठा आहे. त्यामुळे या जंगली प्राण्यासाठी हा भाग सुरक्षित असल्याने त्याचा वावर गेले आठवडाभर या परिसरात आहे. या जंगली प्राण्याला हुसकावून लावण्याकरिता वन कर्मचाऱ्यांनी दोन दिवस प्रयत्न केले. स्थानिकांच्या मदतीने रात्रीची पाहणी केली. रात्री फटाके फोडून त्याला या भागातून हुसकावून लावण्यासाठी प्रयत्न केले. मात्र या भागातच तळ ठोकलेला हा प्राणी अधून-मधून शेळ्या, बोकड, मेंढ्या यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार मारत आहे. त्यांचे मांस खाऊन पुन्हा लपून बसत आहे. भूक लागल्यानंतर बाहेर पडून पुन्हा हल्ला करत आहे. त्याच्या हल्ल्यात या भागातील काही शेतकऱ्यांच्या शेळ्या व बोकड मरण पावले आहेत. 

हा जंगली प्राणी अगदी दिवसाढवळ्या सुद्धा शेळ्या-मेंढ्यांवर हल्ला करून त्यांना ओढून नेत आहे. काल (शुक्रवारी) दुपारीही या प्राण्याने या परिसरातील महादेव मेटकरी यांच्या घरासमोर असणाऱ्या शेळ्यांवर हल्ला केला होता. त्यात काही शेळ्या जखमी झाल्या आहेत. लोकांनी आरडाओरडा करत त्याला हुसकावून लावल्यानंतर तो पळून गेला. या जंगली प्राण्याचा बंदोबस्त करण्याकरिता वन विभागाने पुढील व्यूहरचना करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांमधून होत आहे. 

गेल्या आठवड्यात हा प्राणी प्रथम दिसला. मात्र तो कुठला प्राणी आहे, याबाबत कोणालाही माहीत नाही. त्याला हुसकावून लावण्यासाठी वन कर्मचाऱ्यांनी गेल्या आठवड्यात रात्रीच्या वेळी फटाके फोडून प्रयत्न केला होता; मात्र तो अजूनही या भागातच आहे. 
- बापू कोळेकर, 
रहिवासी, महूद 

मागील चार दिवसांपूर्वी या जंगली प्राण्याने घरासमोर असणाऱ्या शेळ्यांवर हल्ला करून बोकड व पाट यांना ठार मारले होते. मेलेले बोकड आढळून आले, मात्र पाट कुठेही दिसून आली नाही. 
- नाना साळुंखे, 
रहिवासी, महूद 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हरिश राणाचं निधन, १३ वर्षांच्या मरणयातनांमधून सुटका; भारतात पहिल्यांदाच इच्छामरण

Amazon Cloud Outage : ॲमेझॉन AWS वर ड्रोन हल्ला! UAE-बहारीन क्लाउड सेंटर ठप्प; भारतीय कंपन्यांसाठी चेतावणी, बँका-मोबाईल ॲप्स बंद

Farmers Protest : नांदगाव येथे महामार्ग रोको; आंबा-काजू बागायतदारांचा ‘वर्षा’वर धडक देण्याचा इशारा

Latest Marathi News Live Update : संभाजी नगरमध्ये वाहनांच्या गोडाऊनला आग

जगभरात गंभीर संकट, भारतासाठी चिंताजनक स्थिती; पण इंधन तुटवडा नाही; राज्यसभेत PM मोदींनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT