Yash Bhosle 
सोलापूर

पापरीचा यश भोसले ऑनलाइन शिक्षण घेतोय चक्क गुरांच्या गोठ्यात !

राजकुमार शहा

मोहोळ (सोलापूर) : पापरी (ता. मोहोळ) येथील यश दादासाहेब भोसले हा विद्यार्थी मोबाईल इंटरनेटला रेंज येत नसल्याने चक्क गुरांच्या गोठ्यात ऑनलाइन शिक्षण घेत आहे. त्याच्या या शिक्षण चिकाटीचे कौतुक मात्र सर्वत्र होत आहे. 

यश भोसले हा पापरीच्या दक्षिणेकडील बाजूस गावापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर उजनी कालव्याच्या जवळ राहतो. गेल्या सहा महिन्यांपासून सर्वत्रच ऑनलाइन तास व अभ्यासाचे फॅड सुरू झाले आहे. यशच्या घरात मात्र कुठल्याही सिम कार्डला रेंज येत नाही. मात्र गुरांच्या गोठ्यात आले की केवळ दोन किंवा तीन काड्या रेंज येते, तीही तुटक असल्याने शिकविलेले समजत नाही. रेंज येत नसल्याने यश मोबाईल हातात घेऊन आंब्याच्या झाडाखाली रेंजची वाट पाहात थांबतो. रेंज आली की त्याच्या अभ्यासाला सुरवात होते. 

त्याची ही धडपड गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. यश हा अगोदर गावातील शिक्षकाच्या ग्रुपमध्ये होता, परंतु काहीच समजत नसल्याने तो त्यातून बाहेर पडून पेनूर येथील शिक्षकाच्या लाईव्ह ग्रुपमध्ये जॉईन झाला. तरीही फळ्यावर काय लिहिले आहे हे स्पष्ट दिसत नाही, आवाजही खरखरत असल्याने त्याला ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. 

ऑनलाइन शिक्षण पद्धत आज जरी चांगली वाटत असली तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोबाईल सिमकार्डला रेंज येत नाही, अशा मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. अनेक पालकांनी आपल्या आर्थिक अडचणी बाजूला ठेवून पाल्यांना नवीन मोबाईल घेऊन दिले आहेत; मात्र रेंज येत नसेल तर ऑनलाइन शिक्षण कसे होणार? ग्रामीण भागातील अनेक शेतकरी शेतातच राहात आहेत. मात्र कितीही अडचण आली तरी त्याच्यावर मात करून शिक्षण घ्यायचेच, अशी जिद्द बाळगलेल्या यशला ऑनलाइन शिक्षणात कितपत यश येते, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. कारण, अभ्यासात हुशार असूनही केवळ ऑनलाइन शिक्षणात मोबाईल रेंजची मोठी समस्या यशसारख्या अनेक विद्यार्थ्यांना सतावत आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : 'कॅप्टन खरात फाईल्स' मध्ये खळबळजनक खुलासा! सीसीटीव्ही रेकॉर्डिंग ठरले मुख्य पुरावा; एसआयटीकडून नीरज जाधवचा शोध सुरू

Pune News: पुणे जिल्ह्यातील दुर्गम भागातील विकास ‘व्हेंटिलेटर’वर; जुन्नर, आंबेगाव तालुक्यांतील आदिवासी बांधव सोयीसुविधांपासून वंंचित!

‘धुरंधर 2’ ची एंट्री अन् मिम्सचा जल्लोष! सोशल मीडियावर भन्नाट रिअ‍ॅक्शन व्हायरल

CET Cell Exam: सीईटी परिक्षेत मोठा बदल, यंदा विद्यार्थ्यांना दोन हॉल तिकीटं मिळणार, कारण काय?

Latest Marathi News Live Update : कॅप्टन खरातचा ऑफिस बॉय नीरज जाधव अजूनही फरार

SCROLL FOR NEXT