water_tab 
सोलापूर

शिक्षकांच्या "या' गावात ना जलशुद्धीकरण यंत्रणा, ना स्वच्छ पाणी ! 

राजकुमार शहा

मोहोळ (सोलापूर) : पाटकुलला (ता. मोहोळ) गेल्या दहा वर्षांपासून पाणीपुरवठा करणारी टाकीच नाही. त्यामुळे गावातील नागरिकांना थेट पाणीपुरवठ्याच्या विहिरीतून पाइपलाइनद्वारे पुरवठा केला जात आहे. ना जलशुद्धीकरण यंत्रणा, ना स्वच्छ पाणी यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

पाटकुल हे सुमारे 12 हजार लोकसंख्येचे गाव. राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे, सुशिक्षित गाव. गावात व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, तर जवळजवळ प्रत्येक घरात शिक्षक असल्याने "शिक्षकांचे गाव' म्हणूनही पाटकुलची ओळख आहे. तालुक्‍यातील विविध शासकीय विभागांचे कर्मचारीही मोठ्या संख्येने या ठिकाणी आहेत. गेल्या दहा वर्षांपूर्वी गावानजीक असलेली पाण्याची जुनी टाकी खराब व तिची दुरवस्था झाल्याने ती पाडण्यात आली. तेव्हापासून गावाला पाण्याची टाकी नाही. सध्या मोटारी चालू करून गावातील ठराविक वेळेनुसार गल्लीनिहाय पाणीपुरवठा केला जात आहे, तोही दोन दिवसांआड. विद्युतपुरवठा सुरू नसला की मात्र पाण्याची ओरड होत आहे. 

गेल्या तीन महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत नवीन सदस्य मंडळ सत्तेवर आले आहे. सरपंच शिवाजी भोसले यांनी ग्रामपंचायतीची रोजनिशी लिहिण्याचा नवीन पायंडा पाडला आहे, तर "सरपंच पाटकुल' या नावाने मोबाईलमध्ये ग्रुप तयार केला आहे. नागरिकांनी ग्रामपंचायतीमध्ये ठेवलेल्या रजिस्टरमध्ये काय समस्या आहेत, ती लिहून जायचे तसेच ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे, त्यांनी समस्या ग्रुपवर टाकायची, सरपंच ते पाहून संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्याला तातडीने त्या ठिकाणी जाऊन समस्या निवारणासाठी सूचना देतात. कठीण समस्या असेल, तर सरपंच स्वतःही त्या ठिकाणी जातात व ती सोडविण्याचा प्रयत्न करतात. 

दरम्यान, सध्या मोहोळ तालुक्‍यात लसीकरणाची मोहीम जोरात सुरू आहे. पाटकुलला वाड्या-वस्त्या मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे प्रत्येकाकडेच लस घेण्यासाठी जाण्या - येण्यासाठी वाहनाची व्यवस्था असेलच असे नाही. त्यावर पर्याय म्हणून सरपंच भोसले यांनी ग्रामपंचायतीच्या तिजोरीवर भार न टाकता स्वखर्चातून ज्येष्ठ नागरिक वा कोणीही असो त्याला घरून आणून लस देऊन पुन्हा घरी सोडण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याने फक्त ग्रामपंचायतीशी संपर्क साधून नाव नोंदवायचे आहे. अशा या गुणवंत गावाला अशुद्ध पिण्याचे पाणी प्यावे लागते, ही बाब दुर्दैवी आहे. वाड्या-वस्त्यांवरही ही परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. 

पाटकुलला पाणीपुरवठ्यासाठी नवीन 25 लाखांचा प्रस्ताव शासनाकडे दिला आहे. तो मंजुरीनंतर पाणीपुरवठा सुरू होईल. 
- श्री. खंदारे, 
ग्रामसेवक, पाटकुल 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI च्या कारवाईचा दणका! Dabur नंतर Zandu सह ५ कंपन्यांवर कडक कारवाई; कारण काय?

Pimpalwandi News : पिंपळवंडी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक गिल यांच्याकडे संतप्त सवाल; पिंपळवंडी येथील पोलीस आऊट पोस्ट दहा वर्षापासून बंद

Shubman Gill: "तो खेळाडू भारतासाठी दीर्घकाळ खेळेल!", श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर गिलची मोठी भविष्यवाणी!

Marathi News Live Updates : 'आप' नेते सत्येंद्र जैन आणि इतर ४ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Sangola News : सांगोल्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT