Thermal screening of 20000 citizens in Pandharpur city treatment of 27 people 
सोलापूर

पंढरपूर शहरात 20 हजार नागरिकांचे थर्मल स्क्रिनिंग, 27 जणांवर उपचार 

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (जि. सोलापूर) : सोलापुरात कोरोनाचे थैमान सुरू आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने लोकांच्या पोटात भितीचा गोळा उभा राहिला आहे. त्यातच सोलापूर शहरात तीन रूग्णांचा मृत्यु झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर पंढरपुरात देखील पालिकेने खबरदारीचे विविध उपाय सुरु केले आहेत. याचाच एक भाग म्हणून नगरपालिकेने शहरातील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी व थर्मल स्क्रिनिंग मोहिम सुरू केली आहे. आतापर्यंत शहरातील विविध भागातील सुमारे 20 हजार लोकांचे थर्मल स्क्रिनिंग केले आहे. उर्वरित 80 हजार लोकांचे येत्या आठ दिवसात थर्मल स्क्रिनिंग केले जाणार आहे, अशी माहिती पालिकेचे मुख्याध्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी आज सकाळ शी बोलताना दिली. 
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेच्या वतीने नागरिकांना घरातच बसण्याचे आवाहन केले आहे. तरीही काही लोक भाजीपाला खरेदीसाठी रस्त्यावर येत असल्याचे दिसून आल्यानंतर पालिकेने तीन दिवस जनता कर्फ्युचे आवाहन केले होते. आज दुसऱ्या दिवशीही जनता कर्फ्युला चांगला प्रतिसाद मिळाला. पालिकेने यापूर्वीच शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये व बॅंकांमध्ये जंतुनाशकांची फवारणी केली आहे. 
शिवाय पालिकेच्या वतीने कोरोना विषयी शहरामध्ये रिक्षा फिरवून जनजागृतीचे व घरातच बसून राहण्याचे आवाहन केले जात आहे. शहरात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण किंवा संशियतही आढळून आला नाही. तरीही सोलापुरातील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या विचारात घेता पालिकेने देखील खबरदारी घेत सावध पवित्रा घेतला आहे. शहरातील नागरिकांचा कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी पहिल्या टप्प्यात सर्व लोकांचे थर्मल स्क्रीनिंग करण्याचे काम सुरु केले आहे. यासाठी आरोग्य विभागाचे जवळपास 32 कर्मचारी काम करत आहेत. आतापर्यंत जवळपास 20 हजाराहून अधिक लोकांचे थर्मल स्क्रीनिंग केले आहे. उर्वरित 80 हजार लोकांचे देखील येत्या आठ दिवसात थर्मल स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs CSK: सिक्स मारल्यानंतरही शिवम दुबेला कसं केलं आऊट? रवींद्र जडेजा म्हणाला, 'त्याला नेट्समध्ये गोलंदाजी केलीये, माहित होतं तो...'

RR vs CSK: वैभव सूर्यवंशीचा चेन्नईविरुद्ध झंझावात! विक्रमी अर्धशतक करत राजस्थानला मिळवून दिला 'रॉयल' विजय

लाडकी बहीण योजनेतून ७१ लाख महिला बाहेर, Ekyc साठी उरले फक्त २४ तास

IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना

खरात बोलतात तसं घडतं! माणिकराव कोकाटेंबद्दल तंतोतंत भविष्यवाणी केलेली; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात १३ पानं खरातवर

SCROLL FOR NEXT