hunting.jpg 
सोलापूर

बेंदूर सणाच्या दुसऱ्या दिवशी ते करतात शिकारी 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर: कर्नाटकातील बेंदूर सणाच्या प्रथेमध्ये होणाऱ्या प्राणिहत्या टाळण्यासाठी वनखाते व निसर्ग संवर्धन मंडळाने गस्ती मोहिमा सुरू केल्या आहेत. या पथकाने केगावजवळ शिवाजीनगर भागात एका काळविटाची शिकार केल्याचा प्रकार उघडकीस आणला आहे. बेंदुर सणाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता. 6) करीच्या दिवशी होणाऱ्या प्राणिहत्यांच्या विरोधात ही कारवाई केली जात आहे. 

कर्नाटकामध्ये बेंदूर (बैलपोळा  हा सण मोठ्या प्रमाणात पाळला जातो. त्याला कारहुणवीचा सण म्हणतात. हा सण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी करीला प्राण्याची शिकार करण्याचे प्रकार होत असतात. कर्नाटकाच्या सीमेवर शिकारीचे प्रकार रोखण्यासाठी वनखाते व निसर्ग संवर्धन मंडळ यांच्या वतीने विशेष गस्ती मोहीम सुरू झाली आहे. वन्यप्राण्यांची शिकार करण्याचे प्रकार रोखणे गरजेचे झाले आहे. 
सीमावर्ती भागात घोरपड, ससे व इतर वन्यजीवांची शिकार सुरू झाली आहे. याविरोधात वनखात्याने मोठ्या प्रमाणात मोहीम हाती घेतली आहे. उपवनसंरक्षक प्रवीणकुमार बडगे यांनी प्राणिहत्येचा हा प्रकार निव्वळ बेकायदेशीर असून याबाबत कायद्यानुसार कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. यामध्ये सोलापूर, अक्कलकोट, मंगळवेढा या तालुक्‍यांच्या परिसरातील गावांमध्ये विशेष लक्ष ठेवले जात आहे. 

बुधवारी (ता. 3) केगावजवळ शिवाजीनगर भागात एका काळविटाची शिकार करण्यात आल्याचे आढळून आले. तेव्हा निसर्ग संवर्धन मंडळ व वनखात्याचे पथक घटनास्थळी पोचले. तेव्हा शिकारी तेथून पळून गेल्याचा प्रकार घडला. काही ठिकाणी या गस्ती पथकाने शिकारीचे जाळे लावल्याचे देखील दिसून आले. मारलेला प्राणी नेमका कोणता होता या बाबत वनखात्याने पंचनामा करून पुढील तपास चालवला आहे. 
या अंतर्गत पाच विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्‍यात मंद्रूप, माळकवठे, हत्तूर, औराद, तेलगाव शिवार, वळसंग, कुंभारी, धोत्री, चपळगाव आदी गावांत पथके कार्यरत आहेत. अक्कलकोट तालुक्‍यात वागदरी, शिरवळ, पानमंगरूळ, तडवळ या भागात गस्त सुरू आहे. मैंदर्गी शिवारात दोन सशस्त्र पथके सक्रिय झाली आहेत. या सणाच्या दिवशी शिकार करून धार्मिक कार्यक्रमाची परंपरा आहे. पूर्वी प्राण्याचे मृत शरीर दोरीला लटकवून गावातून मिरवणूक काढण्याची प्रथा वनखात्याच्या कारवाईमुळे बंद झाली आहे.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हार्दिक पांड्या १० षटकं फेकू शतक नाही! गौतम गंभीरचं ऑल राऊंडरच्या भविष्याबाबत मोठं विधान; म्हणाला, नितीश कुमार रेड्डी...

IND vs AFG: थांब आधी तुझे केस नीट करू... वैभव सूर्यवंशीचा मालिका विजयानंतर अभिषेक शर्मासोबत Bromance; Viral Video

Primary Teachers: पोर्टल, प्रशिक्षण, सर्वेक्षण अन् समित्या; शिक्षकांच्या ७२ कामांची यादी पाहून अध्यापनाचा प्रश्न ऐरणीवर

Marathi News Live Updates : शरद पवारांच्या पत्रानंतर सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; १७ दिवसांत अहवाल सादर करण्याचे मंत्र्यांचे निर्देश

Santosh Pandit Latest News : संतोष पंडित पुन्हा व्हिडिओ करणार? जामिनावर बाहेर येताच दिला थेट इशारा; ‘मी थांबणार नाही’

SCROLL FOR NEXT