"They 'said five people from Karnataka, then shoot us ...! 
सोलापूर

कर्नाटकातील "ते' पाचजण म्हणाले, तर आम्हाला गोळ्या घाला...!

तात्या लांडगे

सोलापूर ः कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील पासनगरा येथील पाच तरुण शेतीविषयक प्रशिक्षणसाठी लॉकडाउनपूर्वी लातूरला गेले. लॉकडाउनमुळे अडकून पडलेले ते तरुण सोलापूरमार्गे कर्नाटकच्या दिशेने निघाले. वाहतुक बंद असल्याने त्यांनी तब्बल 148 किलोमीटरचा प्रवास करीत 3 एप्रिलला सोलापूर गाठले. 

लातूरहून ते पाच तरुण तुळजापूरमार्गे सोलापुरात आले. दरम्यान, त्यांनी पाणी पिऊन दिवसाचा प्रवास केला तर रात्री बिस्किटे आणि पापड्या खाऊन रात्र काढली. दहा दिवस त्यांनी असा प्रवास केला. मुलांचे वय 18 ते 19 दरम्यान असल्याने त्यांचे पालक दररोज त्यांच्याशी संपर्कात होते. मात्र, लातूरमध्येच असल्याचे पालकांना खोटे सांगत त्यांनी दहा दिवसांत सोलापूर गाठले. कुटुंबातील लोक घाबरू नयेत म्हणून महाराष्ट्र बॉर्डर पास केल्यावर पालकांना सांगायचे असा निश्‍चय त्यांनी केला होता. बॉर्डर पास करण्याचा प्रयत्न अखेर सोलापुरात आल्यावर फसला. तुळजापूर नाका परिसरातील पोलिसांनी त्यांना रामकृष्ण हॉस्पिटलमधील मुलांच्या वस्तीगृहात ठेवले. 14 दिवस राहून झाल्यावर त्यांना वाटले आता आपण जाऊ शकतो, आपल्याला कोणी आडवणार नाही म्हणून ते कर्नाटकच्या दिशेने पायी निघाले. मात्र, रंगभवन परिसरात पोलिसांनी त्यांना हटकले. त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारून एका मंगल कार्यालयात 14 दिवसांसाठी ठेवले. तत्पूर्वी, त्या मंगल कार्यालयात 62 व्यक्ती क्वारंटाईन मध्ये ठेवले आहे. 

...गोळ्या घाला, नाहीतर जावू द्या ओ आम्हाला 
कर्नाटकातून शेतीविषयक प्रशिक्षणकरीता गेलेली मुले लॉकडाउनमुळे महाराष्ट्रात अडकल्याची चिंता पालकांना लागली. त्यांनी मुलांना दररोज संपर्क करून दिलासा देत काळजी घेण्याचे आवाहन केले. मात्र, घरातील आई, वडील, लहान भाऊ, बहीण यांच्या आठवणीने व्याकुळ झालेले तरुण पायी निघाले. खूप वाहनांना हात केला पण कोणीच थांबले नाही. 148 किलोमीटर ते पायी सोलापुरात आले आणि तिथून आता कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यात पायीच जाणार होते. लॉकडाउन 3 मे रोजी संपला तर सोडू नाहीतर लॉकडाउन संपेपर्यंत इथेच थांबावे लागेल, असे पोलिसांनी सांगितल्याचे एका मुलाने 'सकाळ'शी बोलताना सांगितले. आम्हाला कोरोना झाला असेल तर गोळ्या घाला, मात्र आमचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असेल तर घरी जाऊ द्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan railway special trains demand : मुंबई, पुणे ते कोकणदरम्यान विशेष रेल्वेगाड्या मिळणार का?, आंगणेवाडी यात्रेनिमीत्त मागणी

YouTube Revenue : YouTube ची कमाई किती? Netflix लाही टाकलं मागे! आता 'या' फीचर्सवर करणार फोकस

Latest Marathi News Live Update : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार प्रकरणातील आरोपी आज किल्ला कोर्टात रिमांडसाठी हजर

Nashik Gram Panchayat : नाशिकच्या ग्रामीण भागात आता 'प्रशासकराज'! ६२२ ग्रामपंचायतींच्या चाव्या सरकारी अधिकाऱ्यांकडे

Dating Course Scam : पुरुषांना कसे आकर्षित करायचे? ऑनलाईन कोर्स विकून महिलेने केली कोट्यवधींची कमाई, पण आता उद्भवलं नवं संकट...

SCROLL FOR NEXT