horse theft esakal
सोलापूर

चोरट्याने सोलापुरातून पळविला दीड लाखांचा घोडा! काही दिवसांपूर्वी सोलापुरात चोरट्याने चोरला होता कुत्रा; पोलिस घेताहेत चोरट्यांचा शोध

वडिलांचा अनेक वर्षांपासून टांगा चालविण्याचा व्यवसाय होता, काळाच्या ओघात हा व्यवसाय बंद पडला. पण, बालपणी वडिलांसोबत फिरताना घोड्यांबद्दल आकर्षण निर्माण झाल्याने अतिश वसंत पवार (रा. हांडे प्लॉट, सोलापूर) या तरुणाने दीड लाखांचा घोडा दोन महिन्यांपूर्वीच विकत घेतला होता.

तात्या लांडगे

सोलापूर : वडिलांचा अनेक वर्षांपासून टांगा चालविण्याचा व्यवसाय होता, काळाच्या ओघात हा व्यवसाय बंद पडला. पण, बालपणी वडिलांसोबत फिरताना घोड्यांबद्दल आकर्षण निर्माण झाल्याने अतिश वसंत पवार (वय २९, रा. जुना पूना नाका, हांडे प्लॉट, सोलापूर) या तरुणाने दीड लाखांचा घोडा दोन महिन्यांपूर्वीच विकत घेतला होता. तो घोडा चोरट्याने बुधवारी (ता. ११) मध्यरात्री चोरून नेला असून पवार यांनी या प्रकरणी फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

सोलापूर शहरातून दररोज सरासरी दोन दुचाकी चोरी होतात, अशी स्थिती आहे. महिलांच्या गळ्यातील दागिने, रिक्षा प्रवासात महिलांचे साहित्य चोरी, घरफोडी असेही शहरात गुन्हे सतत घडतात. पण, आता चोरटे कुत्री, घोडा असे पाळीव प्राणी देखील सोडत नसल्याचे पाहायला मिळत आहे. एक महिन्यापूर्वी सदर बझार पोलिसांच्या हद्दीतील सात रस्ता परिसरातून चोरट्यांनी महागडा पाळीव कुत्रा चोरून नेला होता. अशीच घटना एक वर्षापूर्वी सदर बझार पोलिस ठाण्याच्या हद्दीतच सिव्हिल चौक परिसरात घडली होती. दरम्यान, आता अतिश पवार यांनी केमवरून (ता. करमाळा) दोन महिन्यांपूर्वीच दीड लाख रुपये देऊन घोडा आणला होता. फिर्यादी रिक्षा चालवतात. त्यांनी आवड म्हणून घोडा विकत घेतला होता.

मोकळ्या मैदानातून चोरला घोडा

तो घोडा विवाह किंवा अन्य कार्यक्रमांसाठी देखील भाड्याने देत होते. ११ जून रोजी रात्री साडेदहा ते अकरा वाजेपर्यंत तो घोडा बांधलेल्या ठिकाणीच होता, असे फिर्यादीने पोलिसांना सांगितले. तो घोडा अवंती नगरातील स्वामी विवेकानंद शाळेच्या मोकळ्या मैदानात बांधलेला होता. रात्री कोणाचेही लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्याने तो घोडा चोरून नेला आहे. पोलिस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पडताळणी करीत आहेत. पोलिस हवालदार प्रवीण चुंगे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, Video: एकट्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने झुंज दिली, पण संघाने साथ सोडली; अश्विनचा राजस्थान रॉयल्सवर हल्लाबोल

Karnataka CM: कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? तारीख आली समोर, डीके शिवकुमार २५वे मुख्यमंत्री होणार

Latest Marathi Update Live: TMC अध्यक्षा ममता बॅनर्जी अपोलो रुग्णालयात दाखल झाल्या

Pune Civic Funds: पुणे महापालिकेला समाविष्ट ३२ गावांचा जीएसटी परतावा थकित; १८८६ कोटींअभावी पायाभूत विकास अडखळला

तो ३०- ४० जण घेऊन माझ्या घराजवळ... पुसदमध्ये 'चला हवा येऊ द्या' फेम अंकुर वाढवेवर टोळक्याकडून हल्ला; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT