Solapur_Crime 
सोलापूर

चोरीचा नवा सोलापुरी फंडा ! साडीचे आमिष दाखवून दोन महिलांकडील दागिने, रोकड लंपास 

तात्या लांडगे

सोलापूर : साडी देण्याचे आमिष दाखवून दोन महिलांची फसवणूक केल्याची घटना पानगल हायस्कूलजवळील के. एस. सी. अपार्टमेंट परिसरात घडली. या दोन्ही प्रकरणी जेलरोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षातून चोरीचा प्रकार कमी झाल्यानंतर शहरात आता हा नवा फंडा सुरू झाला आहे. 

मुस्लिम पाच्छा पेठेतील अंबाबाई मल्लिकार्जुन गबारे यांना एक व्यक्‍ती भेटली. "मैं दुबई मे काम करता हूँ, मेरे पास बहुत पैसा है, मेरे बेटे की शादी में साडी और पैसे बॉंट रहा हूँ, आज मैनें सुबह से तीन लाख रुपये बॉंटे है, आप गरीब है इसलिये मैं आपको मदत कर रहा हूँ', असे म्हणून त्याने अंबूबाई यांचा विश्‍वास संपादित केला. त्यानंतर अंगावरील सोने काढून द्या व तुमच्या गळ्यातील सोने गहाण ठेवल्याचे सांगा, असे म्हणून त्यांच्याकडील सोने आणि रोकड काढून घेतली. 

त्याच दिवशी नागरबाई हरी रणदिवे (रा. पांढरे वस्ती, जुना कारंबा नाका) या विजापूर वेस येथून उर्दू शाळेजवळून पेंटर चौकाकडे पायी चालत ढाळे विकत होत्या. त्या वेळी एक व्यक्‍ती त्यांना भेटली आणि "ढालेवाली मौसी रुको, तुम्हारे जैसे गरीब लोगों को एक लडकी मोफत साडी बॉंट रही है, तो आप आपके गले का सोना मेरे पास दो, नही तो उनको लगेगा की तुम पैसे वाले लोग है, तुम्हे साडी नही देंगे', असे म्हणून त्यांच्याजवळील सोने व रोकड काढून घेतली. या प्रकरणी जेलरोड पोलिसांत फिर्याद दाखल झाली असून पोलिसांकडून त्या व्यक्‍तींचा शोध सुरू झाला आहे. 

बेशिस्त वाहनचालकांना 20 लाखांचा दंड 
शहरातील बेशिस्त वाहतूक थांबावी, अपघाताचे प्रमाण कमी होऊन वाहतूक सुरळीत व्हावी, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वाहनचालकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, मास्क घालावे या हेतूने वाहतूक पोलिस दररोज बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करीत आहेत. 17 ऑगस्टपासून आतापर्यंत शहर पोलिसांनी 19 हजार 807 बेशिस्त वाहनचालकांकडून तब्बल 19 लाख 87 हजार 900 रुपयांचा दंड वसूल केला आहे. रविवारी (ता. 27) पोलिसांनी 111 वाहने आणि मास्क नसलेल्या 175 व्यक्‍तींवर दंडात्मक कारवाई करीत त्यांना साडेसतरा हजार रुपयांचा दंड केला. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

Gangapur News : १ लाख रुपयांच्या हुंड्यासाठी आणि जामिनाच्या पैशांसाठी विवाहितेचा छळ; चिमुकलीचा ताबा घेत विवाहितेला घरातून हाकलले

Ausa News : ओमराजेंबाबत आदित्य ठाकरेंचा ‘सॉफ्ट कॉर्नर’? बंडखोरी केलेल्या खासदारावर थेट बोलणे टाळले; ‘यायला हवे होते’ एवढेच उत्तर

SCROLL FOR NEXT