Daroda 
सोलापूर

वैराग येथे सराफ दुकानावर दरोडा ! 13.28 लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास 

कुलभूषण विभूते

वैराग (सोलापूर) : वैराग (ता. बार्शी) येथील प्रसिद्ध सोन्या- चांदीच्या व्यापाऱ्याच्या दुकानात अज्ञात चोरट्यांनी धाडसी दरोडा टाकत लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. विनय चंद्रकांत गोवर्धन यांच्या मालकीच्या सोने - चांदीच्या दुकानावर बुधवार - गुरुवारच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकला. अज्ञात चोरट्यांविरोधात वैराग पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 

याबाबत वैराग पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की वैराग येथील विनय चंद्रकांत गोवर्धन (वय 61) यांचे मे. चंद्रकांत गोविंद गोवर्धन' या नावाचे सोन्या -चांदीचे दुकान असून, ते स्वतः चालवतात. तर या दुकानात सागर दत्तात्रय माळी हे मॅनेजर म्हणून काम पाहतात. गोवर्धन हे बुधवारी 23 डिसेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता दुकान बंद करून घरी गेले. गुरुवारी 24 डिसेंबर रोजी सकाळी पावणेसहाच्या दरम्यान झाडण्याचे काम करणारी बबिता बाबूराव दीक्षित हिने गोवर्धन यांच्या घरी येऊन सांगितले, की दुकान उघडे दिसले. त्यावर, एवढ्या लवकर दुकान का उघडले, असे म्हणत गोवर्धन यांनी तातडीने दुकानात जाऊन पाहिले असता दुकानाचे तीन शटर अर्धवट उघडे दिसले. दुकानात पाहिले तर अंदाजे 12 किलो 601 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने (किंमत 8 लाख 2 हजार 76 रुपये), सोन्याचे 101 ग्रॅम 800 मिलिग्रॅम वजनाचे (किंमत 5 लाख 18 हजार 568 रुपये) दागिने व रोख 8 हजार 250 रुपये असा एकूण 13 लाख 28 हजार 894 रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला, अशी फिर्याद विनय गोवर्धन यांनी दिली. 

आठ ते दहा तरुण चोरट्यांनी हातात धारदार लोखंडी शस्त्रे घेऊन हा प्रकार केल्याचे पहाटे फिरावयास जाणाऱ्यांनी सांगितले. त्यात एका तरुणास दम दिल्याचा प्रकार घडला. या दरोड्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अरुण सुधाकर व उपनिरीक्षक राजेंद्र राठोड यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळाला भेट दिली. अधिक तपासाकरिता श्वानपथक व ठसे तज्ज्ञास पाचारण करण्यात आले होते. श्वानाने चोरांचा माग काढून दिला असून, त्या दृष्टीने तपासपथके रवाना केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

बुधवार ठरतो घातवार ! 
यापूर्वी 2006 मध्ये बुधवारीच 18 ते 20 जणांनी विनय गोवर्धन यांच्या दुकानावर दिवसा सहा वाजता दरोडा टाकून सुमारे पाच कोटींचे सोने व चांदीचे दागिने लुटले होते. गेल्या वर्षी देखील बुधवारी रोजी येथेच चोरी झाली होती. तिसऱ्यांदा बुधवारीच चोरी झाल्याने गोवर्धन यांना बुधवार हा घातवार ठरत असल्याचे बोलले जात आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandoli National Park : चांदोली जंगलात वाघांचे अस्तित्व वाढले; गवे, डुकरं बदलताहेत अधिवास, वनविभाग कोणतं पाऊल उचलणार?

Babar Azam घरगुती वाघ! PSL मध्ये शतक झळकावून केली विराट कोहली, अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी; रोहितला मागे सोडले

Mumbai News: वाहतूक नियम तोडणाऱ्यांसाठी वाईट बातमी! ‘वन नेशन, वन ई-चालान’ महाराष्ट्रात लागू; नियमभंग केला तर थेट दंड

कुर्डुवाडीच्या प्रियांतिकाची सिनेसृष्टीत दमदार एंट्री! ‘फुला’ चित्रपटातून मांडली मुरळीच्या जगण्याची वेदना; चित्रपटाचे क्रिएटिव्ह डिरेक्टर अमर देवकर बार्शीचे, वाचा...

ICSE and ISC Result : ‘आयसीएसई’चा ९९.१८ टक्के, तर ‘आयएससी’चा ९९.१३ टक्के निकाल; ‘सीआयएससीई’तर्फे दहावी-बारावीचे निकाल जाहीर

SCROLL FOR NEXT