Sveri 
सोलापूर

"स्वेरी'मध्ये तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद ! "टेक्‍नो सोसायटल'चे आयोजन 

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (स्वेरी) च्या वतीने 11 आणि 12 डिसेंबर रोजी "टेक्‍नो सोसायटल-2020' ही तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. समाजाच्या विकासासाठी तंत्रज्ञानाचा वापर हा या परिषदेचा प्रमुख विषय असणार आहे. कोव्हिडच्या पार्श्‍वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने ही परिषद होणार असून, देश-विदेशातील सुमारे साडेतीनशे प्राध्यापक, संशोधक यामध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती संस्थेचे सचिव डॉ. बी. पी. रोंगे यांनी दिली. 

शैक्षणिक क्षेत्रात महाराष्ट्रात नावलौकिक मिळवलेल्या स्वेरी संस्थेच्या वतीने 2016 मध्ये पहिली आणि 2018 मध्ये दुसरी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. आता होणार असलेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्‌घाटन ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा पुरस्कार मिळालेले डॉ. विजय जोशी (ऑस्ट्रेलिया) यांच्या हस्ते होणार आहे. या परिषदेत प्रमुख वक्ते म्हणून डॉ. विजय जोशी (ऑस्ट्रेलिया), डॉ. थॉमस मबूया (नैरोबी), बोतीर उस्मानोव्ह (उझबेकिस्तान), डॉ. एस. पी. अरुण (भारत), डॉ. यल्लोजी राव (अमेरिका), डॉ. मृणालिनी पत्तर्किन (अमेरिका) हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेसाठी देश-विदेशातील तीनशे प्राध्यापक व संशोधकांनी नोंदणी केली असून 350 संशोधनपर लेख आलेले आहेत. सर्व संशोधनपर लेख आंतरराष्ट्रीय प्रकाशनाच्या माध्यमातून प्रसिद्ध केले जाणार आहेत. 

श्री. रोंगे यांनी या वेळी अभियांत्रिकी आणि फार्मसी प्रवेश प्रक्रियेविषयी देखील महत्त्वपूर्ण माहिती दिली. 28 नोव्हेंबर 2020 रोजी एमएचटी-सीईटी 2020 या परीक्षेचा निकाल सीईटी सेलकडून जाहीर करण्यात आलेला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आलेली सीईटी परीक्षा आणि त्यामुळे लांबलेले प्रवेश या पार्श्वभूमीवर शासनाकडून बहुतेक सर्व व्यावसायिक कोर्सेसची प्रवेश प्रक्रिया या आठवड्यात सुरू करून डिसेंबर अखेरपर्यंत अथवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात संपवल्या जाणार आहेत. सर्वसाधारणपणे जानेवारीच्या मध्यापासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याची शक्‍यता आहे. या वेळेस प्रवेशाचे केवळ दोनच राउंड असणार आहेत आणि ही सर्व प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करण्यात येणार आहे. स्वेरीमध्ये प्रवेश प्रक्रियेच्या मार्गदर्शनासाठी कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे, असे त्यांनी नमूद केले. 

पत्रकार परिषदेस संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, विश्वस्त सूरज रोंगे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. पी. एम. पवार उपस्थित होते. 

या विषयांवर परिषदेत चर्चा 
या परिषदेमध्ये पाणी, ऊर्जा, दळणवळण, हाउसिंग आणि निर्जंतुकीकरण यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, रासायनिक आणि भौतिक प्रक्रिया, ग्रामीण आणि शेती संबंधित व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी असणारे तंत्रज्ञान, वापरायोग्य परिसर व आरोग्य संबंधीचे तंत्रज्ञान, ग्रामीण आणि अभियांत्रिकी विकास, ग्रामीण भारतासमोरील आव्हाने आदी विषयांवर चर्चा होणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT