political news Canva
सोलापूर

सोलापुरातील ‘हे’ माजी नगरसेवक कोणत्या पक्षांचे? ठाकरे गट शांत, काँग्रेस, राष्ट्रवादीचा नाराजांवर डोळा

महापालिका निवडणुकीपूर्वी सोलापूर शहरातील अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी पक्षांतर करतील, अशी स्थिती आहे. महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदेसेनेच्या युतीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीची शाश्‍वती पाहून अनेकजण पक्षांतराचा निर्णय घेतील, अशी चर्चा आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील सत्तासंघर्ष आणि आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी होणार की सर्व पक्ष स्वतंत्रपणे लढणार, यावर सोलापूर महापालिकेच्या अनेक माजी नगरसेवकांचे लक्ष आहे. महाविकास आघाडी झाल्यास त्यांना बंडखोरीचा फटका बसू शकतो. स्वतंत्रपणे लढल्यास तिन्ही पक्षाला सर्व जागांवर तगडे उमेदवार मिळतील का, असा दुहेरी पेच सध्या निर्माण झाला आहे.

महापालिका निवडणुकीपूर्वी सोलापूर शहरातील अनेक माजी नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी पक्षांतर करतील, अशी स्थिती आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदेसेनेच्या युतीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीची शाश्‍वती पाहून अनेकजण पक्षांतराचा निर्णय घेतील, अशी चर्चा आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांत शहरातील शिवसेनेचे माजी नगरसेवक राजकुमार हंचाटे, सुनील खटके, किरण पवार, काँग्रेसच्या माजी महापौर नलिनी चंदेले, ॲड. यु. एन. बेरिया, भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल, भाजप युवा मोर्चाचे बिज्जू प्रधाने, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक दिलीप कोल्हे, एमआयएमचे शहराध्यक्ष तौफिक शेख यांच्यासह काही नगरसेवकांनी पक्षांतर केले आहे.

आगामी निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीतील अनेकजण भाजप-शिंदे सेनेत येतील, असा दावा पक्षातील बड्या नेत्यांनी केला आहे. तर भाजप व शिंदे सेनेतील काहीजण आमच्या पक्षात येतील, असा दावा राष्ट्रवादी व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. पण, कोण कोणत्या पक्षात असणार? हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

प्रश्न अनेक, तरी ठाकरे सेनेचे पदाधिकारी गप्पच

शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना व उद्धव ठाकरे यांची शिवसेना, असे दोन गट तयार झाले. शिंदे सेनेने जिल्ह्यात विशेषत: सोलापूर शहरात पाय घट्ट रोवायला सुरवात केली आहे. त्यासाठी जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, मनीष काळजे, चरणराज चवरे, महेश चिवटे व शहरप्रमुख मनोज शेजवाल यांची धडपड सुरु आहे. ठाकरे गटाचे शहरप्रमुख कोण, जिल्हाप्रमुख कोठे आहेत, अशा प्रश्नांचे उत्तर शिवसैनिकांना सापडलेले नाही.

निवडणुका नसल्याने ठाकरे गटाचे बहुतेक पदाधिकारी लोकांमध्ये पाहायला मिळत नसल्याची स्थिती आहे. राज्यातील बेरोजगारी अन्‌ मेगाभरतीची प्रतीक्षा, महागाई, दुधाचे घसरलेले दर, शेतकऱ्यांच्या वाढलेल्या आत्महत्या, कारखान्यांकडून शेतकऱ्यांना न मिळालेली एफआरपी, कांद्याचे घसरलेले दर, असे अनेक विषय असतानाही ठाकरे सेनेचे पदाधिकारी कोणतीच भूमिका घेत नसल्याचे चित्र आहे. मागील काही महिन्यांपासून संपर्कप्रमुख अनिल कोकीळ हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले नाहीत. त्यामुळे ठाकरे सेना कोठे आह? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

‘हे’ नगरसेवक कोणत्या पक्षांचे?

माजी महापौर महेश कोठेंनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आणि अनेकांची पंचाईत झाली. अमोल शिंदे यांनी शिंदे सेनेत जाण्याचा निर्णय घेतला आणि ते जिल्हाप्रमुख झाले. आता देवेंद्र कोठे, कुमुद अंकाराम यांच्यासह कोठे समर्थक नगरसेवक कोणत्या पक्षात राहणार, याची उत्सुकता आहे. वंचित बहुजन विकास आघाडीचे तत्कालीन प्रदेश प्रवक्ते आनंद चंदनशिवे सध्या कोणत्याच पक्षात नाही.

महाविकास आघाडीचे सरकार असताना माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून ते राष्ट्रवादीत जाण्याच्या बेतात होते, पण सत्तांतर झाले आणि चंदनशिवे, गणेश पुजारी यांचा होऊ शकला नाही. काँग्रेसच्या गोल्डन नगरसेविका श्रीदेवी फुलारे, भाजपचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील, काँग्रेसच्या नगरसेविका प्रिया माने हे ताकदवान माजी नगरसेवक पक्षापासून दुरावले आहेत. ते सध्या कोणत्या पक्षात आहेत, या प्रश्नाचे उत्तर अनेकांना सापडलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

आजचे राशिभविष्य - 16 सप्टेंबर 2026

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

SCROLL FOR NEXT