Solapur News sakal
सोलापूर

दोन दिवसात ठरणार यंदाचा गुणवंत कर्मचारी! झेडपी सीईओंच्या बैठकीत होणार एक नाव फायनल; प्रस्ताव तिघांचेच, पण...

सोलापूर जि.प.कडे 3 कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत एक नाव फायनल होऊन ते विभागीय स्तरावर पाठविले जाणार आहे. २०२३-२४ या वर्षातील जि.प.चा गुणवंत कर्मचारी कोण, याची उत्सुकता आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : दरवर्षी ग्रामविकास विभागातर्फे राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषदेतील एका कर्मचाऱ्याला गुणवंत कर्मचारी म्हणून सन्मानित केले जाते. सोलापूर जिल्हा परिषदेकडे तीन कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत एक नाव फायनल होऊन ते विभागीय स्तरावर पाठविले जाणार आहे. २०२३-२४ या वर्षातील जिल्हा परिषदेचा गुणवंत कर्मचारी कोण, याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणे व इतर कर्मचाऱ्यांना प्रेरणा मिळावी या हेतूने दरवर्षी प्रत्येक जिल्हा परिषदेतील एका गुणवंत कर्मचाऱ्याचा ग्रामविकास खात्याकडून राज्य स्तरावर सन्मान केला जातो. त्यानुसार चांगले काम करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत प्रस्ताव दिले आहेत. परंतु, जिल्हा परिषदेच्या विविध कार्यालयांमध्ये महिला व दिव्यांग कर्मचारी देखील चांगले काम करतात, त्यापैकी कोणालाच आजवर पुरस्कार मिळालेला नाही. अधिकाऱ्यांसमोर लुडबूड करणाऱ्यांचेच व लोकप्रतिनिधींनी शिफारस केलेल्यांचेच प्रस्ताव अनेकदा ‘गुणवंत’ म्हणून पाठविल्याची चर्चा सुरू आहे. दिव्यांग असून श्री. हिरजे यांनी प्राथमिक शिक्षणच्या बिंदुनामावलीचे काम यशस्वीपणे पार पाडले. कुर्डुवाडी पंचायत समितीचे कनिष्ठ सहायक आनंद साठे यांनी झेडपी कर्मचाऱ्यांच्या मूळ सेवा पुस्तकात क्युआरकोड आणला.

अशा अनेक कर्मचाऱ्यांचे गुणगान इतरही कर्मचाऱ्यांकडून ऐकायला मिळते. त्यांना पुरस्कार मिळाल्यास जिल्हा परिषदेचा नावलौकिक वाढले आणि त्याबाबत सीईओ मनीषा आव्हाळे उत्तम निर्णय घेतील, असा विश्वास बहुतेक कर्मचाऱ्यांना आहे. मात्र, संबंधित कर्मचाऱ्यांनी पुरस्कारासाठी प्रस्ताव देणे अपेक्षित आहेत. प्रस्ताव न दिल्यास प्राप्त प्रस्तावातूनच एकाची निवड होऊन ते नाव विभागीय स्तरावर पाठविले जाणार आहेत. तत्पूर्वी, इतरही कर्मचाऱ्यांनी प्रस्ताव द्यावेत म्हणून संबंधित विभागप्रमुख पुढाकार घेतील का, प्रस्ताव देण्यासाठी आणखी एक-दोन दिवसांचा अवधी त्यांना मिळेल का, असे प्रश्न उपस्थित होत आहे.

लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या परीक्षा लांबणीवर

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या शासनामार्फत घेतली जाणारी परीक्षा येत्या शनिवार, रविवारी आहे. त्यानंतर पुढील आठवड्यात कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा आहेत. मार्चच्या पहिल्याच आठवड्यात आचारसंहितेची शक्यता असल्याने सीईओंच्या पुढाकारातून होणारी लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या स्वतंत्र लेखी परीक्षा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या मार्चनंतर अपेक्षित आहेत. पण, अजून शासनाकडून त्यासंबंधीचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे एकाच टेबलावर ठाण मांडून असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी की नंतर होणार, हे अस्पष्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT