1vaccination_15.jpg 
सोलापूर

लसीचा दुसरा डोस घेतलेल्यांना कोरोनाचा धोका कमीच ! सोलापूर जिल्ह्यात दोन दिवस पुरेल एवढीच लस

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्ह्यासाठी आतापर्यंत एक लाख 93 हजार लस प्राप्त झाले होते. त्यापैकी आता 13 हजार डोस शिल्लक असून दररोज सात ते साडेसात हजारजणांना ती टोचली जात आहे. दोन दिवस पुरेल इतकीच लस शिल्लक असल्याने जिल्ह्यासाठी आणखी दोन लाख डोस द्यावेत, अशी मागणी आरोग्य विभागाने राज्य सरकारकडे नोंदविली आहे. लसीचे दोन डोस घेतल्यानंतर कोरोनाचा धोका कमी असल्याने लसीकरणासाठी नागरिक स्वत:हून पुढे येऊ लागले आहेत.

26 जणांनी घेतला दुसरा डोस
आरोग्य कर्मचारी आणि त्यानंतर फ्रंटलाईनवरील वर्कर्स यांना कोरोनाची प्रतिबंधात्मक लस टोचण्यात आली आहे. आता 45 ते 60 वर्षांवरील व्यक्‍तींना लस टोचली जात आहे. त्यानुसार आतापर्यंत एक लाख 30 हजार जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. तर दुसरीकडे 19 हजार 300 आरोग्य कर्मचाऱ्यांनी आणि साडेसहा हजार फ्रंटलाईनवरील वर्कर्स यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. दुसरा डोस घेतलेल्यांना कोणताही त्रास जाणवत नसून त्यांना कोरोनाचा धोका अन्य व्यक्‍तींच्या तुलनेत कमीच असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

शहर-जिल्ह्यातील 125 केंद्रांवर कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस टोचली जात आहे. आणखी 50 ठिकाणे वाढविली जाणार असून सध्या 45 ते 60 वर्षांपर्यंतच्या को-मॉर्बिड (पूर्वीचे गंभीर आजार असलेले रुग्ण) रुग्णांसह 60 वर्षांवरील प्रत्येकाला लस दिली जात आहे. 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांचेच लसीकरण केले जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर सोलापूर शहर-जिल्ह्यासाठी आणखी दोन लाख डोस उपलब्ध करून द्यावेत, असे पत्र सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्य सरकारला पाठविले आहे. पत्र पाठवून आठ दिवस झाले असून 50 ते 60 हजार डोस मिळतील, असे सांगण्यात आले आहे. उपलब्ध डोस शिल्लक न ठेवता, लसीकरणासाठी आलेल्यांना द्यावी, अशा सूचना राज्याकडून देण्यात आल्या आहेत. जेणेकरून केंद्र सरकारला वस्तूःस्थितीची जाणीव होऊन पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करून दिली जाईल, हा त्यामागचा हेतू असल्याचेही सांगण्यात आले.

मागणी नोंदविली; 1 एप्रिलला येईल लस
जिल्ह्यातील सुमारे सात ते साडेसात हजार लोक दररोज 125 केंद्रांवर लस टोचून घेत आहेत. 13 हजार डोस शिल्लक असून 1 एप्रिलला आणखी 60 ते 80 हजार डोस उपलब्ध होतील, अशी मागणी करण्यात आली आहे.
- डॉ. अनिरुध्द पिंपळे, जिल्हा समन्वयक, कोरोना लसीकरण, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Dare Village : गावी आलो किंवा लंडनला गेलो तरी पोटदुखी, “ विरोधकांना कामातून उत्तर देईन”,एकनाथ शिंदेंनी दरेतून साधला निशाणा

रोहित शर्माचा Mumbai Indians मधील 'सहकारी' Ajit Agarkar ची जागा घेणार; आता हिटमॅन २०२७ चा वर्ल्ड कप खेळणारच...

सगळं सोडून द्यायचा विचार होता पण...; सुटकेनंतर संतोष पंडित काय म्हणाले? तुरुंगातल्या व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Panvel News: पनवेलमध्ये वाहतुकीत मोठे बदल! गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांसाठी प्रशासनाचे कडक पाऊल

SCROLL FOR NEXT