मोठ्या आवाजाचे फटाके उडवणाऱ्यांना जागेवरच एक हजारांचा दंड! Sakal
सोलापूर

मोठ्या आवाजाचे फटाके उडवणाऱ्यांना जागेवरच एक हजारांचा दंड!

मोठ्या आवाजाचे फटाके उडवणाऱ्यांना जागेवरच एक हजारांचा दंड!

तात्या लांडगे

शहर पोलिसांनी फटाके विक्री करणाऱ्या सर्वच दुकानांची झाडाझडती घेतली. त्यानुसार सदर बझार पोलिसांनी 13 दुकानांवर कारवाई केली आहे.

सोलापूर : दिवाळीच्या (Diwali) निमित्ताने शहरभर फटाके (Firecrackers) विक्रीची दुकाने थाटली आहेत. परंतु, ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने शहर पोलिसांनी त्या सर्व दुकानांची तपासणी केली. बंदी असलेले मोठ्या आवाजाचे फटाके पोलिस (Police) कारवाईत जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी अचानक ही कारवाई केल्याने सर्वच दुकानांमधून मोठ्या आवाजाचे बंदी असलेले फटाके पोलिसांनी ताब्यात घेतले. सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) आदेश व राष्ट्रीय हरीत लवादाच्या सूचनांनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

सोलापूर शहरात कायमस्वरूपी फटाके विक्री करणारी 13 दुकाने आहेत. तर दिवाळीच्या निमित्ताने शहरातील ठिकठिकाणी परवानगी घेऊन तात्पुरत्या स्वरूपात फटाके विक्री करणारी 136 दुकाने आहेत. दरम्यान, 30 ऑक्‍टोबरला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा आधार घेऊन शहर पोलिसांनी सोमवारी फटाके विक्री करणाऱ्या सर्वच दुकानांची झाडाझडती घेतली. त्यानुसार सदर बझार पोलिसांनी 13 दुकानांवर कारवाई केली आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरूच होती. त्या दुकानांमधील मोठ्या आवाजाचे फटाके, साखळी फटाके, बंदी असलेले फटाके जप्त करून पोलिस ठाण्यात आणले आहेत. फटाके व्रिकी करणाऱ्या दुकानांवर कारवाई केल्यानंतर आता पोलिसांनी रात्री आठ ते दहा या वेळेशिवाय अन्य वेळेत फटाके उडविणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे, ज्यांच्याकडे बंदी असलेले मोठ्या आवाजाचे फटाके आढळतील, त्यांच्याकडून संबंधित दुकानांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.

फटाके फोडणाऱ्यांवरही आजपासून कारवाई

ध्वनी, हवा प्रदूषण करणाऱ्यांवर राष्ट्रीय हरीत लवादाने कडक निर्बंध लावले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून आता जागेवरच भरपाई वसूल केली जाणार आहे. त्यानुसार एखादी व्यक्‍ती मोठ्या आवाजाचे निर्बंध असलेले फटाके फोडत असल्यास त्याच्याकडून एक हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. तर ग्रुपने फटाके वाजविणाऱ्यांकडून तीन हजारांचा दंड वसूल केला जाणार आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्‍त डॉ. वैशाली कडूकर यांनी दिली. शिवाय दिलेल्या वेळेतच सर्वांनी फटाके उडवावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: मोठी बातमी! पुण्यातील प्रसिद्ध 'बर्गर किंग'वर FDAची कारवाई; 'झेप्टो'लाही तुकाराम मुंढेंचा दणका

Service Medals: वीरता-सेवा पदकांची घोषणा! CRPF ला सर्वाधिक पदकं; देशाच्या सुरक्षेसाठी प्राण पणाला लावणाऱ्या जवानांचा सन्मान

पाकिस्तान, श्रीलंका ते अमेरिका... जगभरातील लोक भारताकडे कसं बघतात? सर्वात मोठा सर्व्हे समोर

लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाचा भव्य सोहळा! ध्वजारोहणापासून भाषणापर्यंत... १५ ऑगस्टला काय-काय घडणार? वाचा मिनिट-टू-मिनिट वेळापत्रक

R. Ashwin: अश्विन क्रिकेटवर बोलत होता अन् अचानक घराबाहेर पोलीस आले; फोन उचलताच समोर आलं ‘ते’ कारण...

SCROLL FOR NEXT