Solapur Crime News  Sakal
सोलापूर

Solapur Crime News : फोटो व्हायरल करण्याच्या धमकीने साडेसहा लाखांना गंडा

संशयिताविरुद्ध खंडणीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : ओळखीतून मैत्री झाल्याने भेटीचा गैरअर्थ काढून पीडितेशी अश्लील वर्तन केले आणि एकत्रित काढलेले फोटो नातेवाईक व मित्रांना व्हायरल करतो म्हणून वेळोवेळी तब्बल ६ लाख ५७ हजार ५०० रुपयाला गंडा घालण्याचा प्रकार १९ वर्षीय पीडितेने मंगळवारी (ता. १५) रात्री उशिरा दिलेल्या तक्रारीवरून उघडकीस आला. आरोपीविरुद्ध विनयभंग आणि खंडणीचा गुन्हा नोंदवला आहे.

कृष्णकांत अमर रिजोरा (वय ४३, रा. रुबीनगर, सोलापूर) याला बुधवारी रात्री उशिरा अटक करून न्यायालयात उभे करण्यात आले. त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. गुरुवारी त्याला कोठडी संपताच न्यायालयात उभे केले जाणार आहे.

फिर्यादी आणि आरोपीची सप्टेंबर २०२३ मध्ये शहरातील एका महाविद्यालयासमोर ओळख होऊन मैत्री झाली. ते एकमेकांना भेटत. या कालावधीत आरोपीचे दोघांचे एकत्र फोटो, व्हिडीओ काढून घेतले होते. दोन महिन्यांपूर्वी त्याने पीडित तरुणीला बोलावून घेऊन तिच्याशी अश्लील वर्तन केले. यावर पीडितेने त्याला ढकलून दिल्याने तो रागाने निघून गेला.

त्यानंतर आरोपीने पीडितेला फोन करून एकत्र असलेले फोटो, व्हिडीओ मित्रांना व नातलगांना शेअर करतो म्हणून तिला ब्लॅकमेल करू लागला. यामुळे घाबरलेल्या पीडितेकडून आरोपीने ऑनलाइन पद्धतीने ५४ हजार रुपये व सोन्याचे दागिने असे एकूण ६ लाख ५७ हजार ५०० रुपये उकळल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आरोपी आज पुन्हा न्यायालयात

पोलिसांनी तक्रारीची दखल घेऊन नमूद आरोपीला अटक करून न्यायालयात उभे केले. त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी घेण्यात आली आहे. गुरुवारी पोलिस कोठडी संपताच पुन्हा न्यायालयापुढे उभे केले जाणार असल्याचे तपास अधिकारी सपोनि शीतलकुमार गायकवाड यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

आजचे राशिभविष्य - 16 सप्टेंबर 2026

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

SCROLL FOR NEXT