Three deaths due to corona in Solapur 14 patients increased today total 470 infected 
सोलापूर

सोलापुरात कोरोनाने आज तिघांचा मृत्यू; 14 रुग्ण वाढले, एकूण बाधित 470 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर शहर परिसरातील तीन जणांचा आज कोरोनाने मृत्यू झाला. मागील 24 तासांत 14 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने एकूण बाधितांची संख्या 470 तर एकूण मृत व्यक्तींची संख्या 33 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. 
आज मृत्यू झालेली पहिली व्यक्ती साईबाबा चौक परिसरातील 74 वर्षांचा पुरुष असून 18 मे रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांना छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्याच दिवशी रात्री 10:30 वाजता त्यांचे निधन झाले. मृत्यू झालेली दुसरी व्यक्ती अशोक चौक परिसरातील असून 77 वर्षांचा पुरुष असून 13 मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात सारीच्या उपचारासाठी त्यांना दाखल केले होते. 15 मे रोजी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून 19 मे रोजी सायंकाळी सहा वाजता त्यांचे निधन झाले. मृत्यू झालेली तिसरी व्यक्ती शनिवार पेठ परिसरातील 64 वर्षांची महिला असून 5 मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले होते. 19 मे रोजी दुपारी दोन वाजता त्यांचे निधन झाले आहे. आज दिवसभरात कोरोना चाचणीचे 219 अहवाल प्राप्त झाले असून 205 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 14 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या सात जणांना आज घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT