covid centre.jpg 
सोलापूर

मोहोळ पालिकेचे तीन कर्मचारी कोरोना बाधित; तालुक्‍याची संख्या 157 

राजकुमार शहा

मोहोळ(सोलापूर) : शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत शहरात मोहोळ नगरपरिषदेच्या 3 कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत. या प्रमाणे शहरात 7 तर कामती बु.येथे 1 असे एकूण 8 रुग्ण वाढले आहेत. 

शहरातील व तालुक्‍यातील वाढती कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता आरोग्य विभागाच्यावतीने रॅपिड अँटिजेन टेस्ट ही मोठ्या प्रमाणात केल्या जात आहेत. मोहोळ शहरातील ग्रामीण रुग्णालयात संशयित 286 रुग्णांच्या रॅपिड टेस्ट करण्यात आल्या होत्या त्यापैकी 36 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्‍याची संख्या तब्बल 157 झाली आहे. तर मोहोळ शहरात रुग्णांची संख्या 62 झाली आहे. 

नगरपरिषदेच्या एका कायम कर्मचाऱ्याला व दोन हंगामी कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. नागरिकांनी प्राथमिक लक्षणे जाणवल्यानंतर तत्काळ शासकीय व खासगी रुग्णालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. संशयित रुग्णांची ने आण करण्यासाठी विद्यार्थी वाहतूकीच्या बसची व शहरातील 2 शाळा व 2 मंगल कार्यालयाची क्वारंटाईन सेंटरसाठी मागणी केली असल्याचे मुख्याधिकारी एन.के. पाटील यांनी सांगितले. पिंपरी,आय टी आय, कृषी केंद्र आदी कॉंरटाईन सेंटर मध्ये असणाऱ्या स्वच्छतागृह, गरम पाण्याची सुविधा तसेच जेवण आदी मिळणाऱ्या सुविधाबध्दल संबधित रूग्णांच्या नातेवाईकंकडून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे.  
 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bangalore Highway : 92 पिलर अन् 3.47 किमी लांबी! पुणे-बंगळूर महामार्गावरील सर्वात मोठा पूल वाहतुकीसाठी कधी खुला होणार? लोकार्पण लांबणीवर, वाचा नवीन अपडेट

ICAI CA Toppers List : डोंबिवलीचा सुपुत्र देशभर गाजला! सोहन मांजरेकर ठरला देशातील तिसरा CA टॉपर; संपूर्ण टॉपर यादी पाहा

Shubman Gill:'गिलला टी-२० संघातून का डच्चू दिला?' मोहम्मद अझरुद्दीनचा BCCI ला थेट सवाल

Eknath Shinde यांनी लोकसभेतील संख्याबळाचे गणित बदललं! NDA मध्ये बनतील शक्तिशाली नेते; जागांचे गणित पाहा...

Farmer Protest: कर्जमुक्तीच्या लढ्याचा वणवा राज्यभर! तहसील कार्यालयावर व पाण्याच्या टाकीवर चढले शेतकरी, बुलडाण्यात आत्मदहनाचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT