Three members of the same family from Madha taluka tested positive for corona 
सोलापूर

माढा तालुक्‍यातील एकाच कुटुंबातील तीन जण कोरोना पॉझिटिव्ह 

संतोष पाटील

टेंभुर्णी (सोलापूर) : माढा तालुक्‍यातील अकोले बुद्रुक येथील एकाच कुटुंबातील तिघांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे टेंभुर्णी परिसरात खळबळ उडाली आहे. माढा तालुक्‍यातील अकोले बुद्रुक येथील तरुण (वय 30) हा ताप आला असल्याने टेंभुर्णी येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये एक ते तीन जुलै दरम्यान उपचार घेत होता. यानंतर तो अकलूज येथे उपचारासाठी गेला असता त्याचा स्वतः चा, पत्नी व वडिलांचा स्वॅब खाजगी लॅबमध्ये कोरोनाच्या तपासणीसाठी दिला होता. त्यामध्ये तिघांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला. नंतर त्याच दिवशी तरूणास पुणे येथील रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले असून तो सध्या तेथेच उपचार घेत आहे. 
माढ्याचे तहसीलदार राजेश चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत पलंगे यांनी बुधवारी सकाळी तातडीने अकोले बुद्रुक येथे भेट देऊन प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली. प्रशासनाने अकोले बुद्रुक येथील रूग्ण राहत असलेल्या वस्तीचा परिसर सील केला आहे. यावेळी मंडल अधिकारी मनिषा लकडे, तलाठी प्रिती काळे, अकोले बुद्रुकचे सरपंच शिवाजी वाघे, पोलिस पाटील भालचंद्र परबत, कृषी सहाय्यक बलराज गोसावी, परिते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. आरती भारती आदी उपस्थित होते. 
टेंभुणीमध्ये उपचार घेत असलेले खाजगी हॉस्पिटल बुधवारी सकाळीच सील केले असून हॉस्पिटलमधील डॉक्‍टर व त्यांचे कुटुंबीय तसेच सर्व कर्मचारी अशा 18 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले असून हॉस्पिटलचा संपूर्ण परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला आहे. टेंभुर्णीतील खाजगी हॉस्पिटलमध्ये गेल्या आठ दिवसात आलेल्या रुग्णांची माहिती गोळा करण्यात येत आहे. संबंधित तरूणाची पत्नी व वडील सध्या अकोले बुद्रुक येथे असून त्यांना अद्याप कोणताही त्रास नाही. परंतु या कुटुंबातील सर्वांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. टेंभुर्णी शहरातील नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल माने व डॉ. विक्रांत रेळेकर यांनी केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

Maharashtra Ganesh Visarjan Live: मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री गिरगाव चौपाटीवर दाखल

Sharad Pawar : अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' कारखाना निवडणूक बिनविरोध होणार?, शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक

SCROLL FOR NEXT