The number of corona in Solapur increased further 
सोलापूर

धक्कादायक! सोलापुरात आणखी तीन कोरोनाग्रस्त; रुग्णांची संख्या पुन्हा वाढली

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : आज दिवसभरात सोलापुरातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत तिनने वाढ झाली आहे. त्यामध्ये भारतरत्न इंदिरा नगर परिसरातील दोन व नइ जिंदगी परिसरातील  शिवगंगा नगर परिसरातील एका व्यक्तीचा समावेश आहे. यापूर्वी भारतरत्न इंदिरा नगर परिसरातील महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. त्या महिलेच्या संपर्कात आलेल्या दोन व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

आज दिवसभरात कोरोना चाचणीचे नव्वद रिपोर्ट प्राप्त झाले असून त्यापैकी सत्याएंशी रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तीन रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या होम क्वारंटाइनमध्ये तेराशे सत्तावीस जण इन्स्टिट्यूशन क्वारंटाइनमध्ये चारशे सत्याहत्तर जण आहेत.  आयसोलेशन वॉर्डातील  नउशे जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यातील सातशे चव्वेचाळीस जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. दीडशे रिपोर्ट अद्यापही प्रलंबित आहे. प्राप्त झालेल्या सातशे चव्वेचाळीस रिपोर्ट मधील सातशे आकरा  रिपोर्ट निगेटिव्ह आहेत तर तेहत्तीस  रिपोर्ट हे कोरोना पॉझिटिव असल्याची माहितीही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. सोलापुरातील तीन व्यक्तींचा मृत्यू झाला असून तीस जणांवर सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT