Dedicated Covid Center 
सोलापूर

करमाळ्यात तीन नवीन डेडिकेटेड कोव्हिड सेंटर होणार सुरू ! कोरोना टेस्टिंग वाढणार

अण्णा काळे

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने करमाळ्यात तीन नवीन डेडिकेटेड कोव्हिड सेंटर सुरू होणार आहेत. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी अडचण येऊ नये म्हणून शहरातील विविध रुग्णालयांत आणखी 50 बेडची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी दिली. 

करमाळा येथे तहसीलदार समीर माने यांच्या उपस्थितीत कोरोना विषयी बैठक घेऊन चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर डॉ. ढेले यांनी ही माहिती दिली. 

डॉ. ढेले यांनी करमाळा तालुक्‍यातील जेऊर ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन कोव्हिड हेल्थ सेंटर सुरू करण्याबाबत पाहणी केली. याबरोबरच करमाळ्यातील पवार हॉस्पिटल, शहा हॉस्पिटल व शेलार हॉस्पिटलला भेट देऊन सुविधांची पाहणी केली. त्यांनी तहसीलदार समीर माने यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन चर्चा केली. या वेळी करमाळा उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अमोल डुकरे उपस्थित होते. या बैठकीत खासगी दवाखान्यात ऑक्‍सिजन बेड वाढवणे व कोव्हिड हेल्थ सेंटर सुरू करण्याबाबत चर्चा झाली. डॉ. पवार हॉस्पिटल, कमलाई कोव्हिड हेल्थ सेंटर 25 बेड, डॉ. संदेश शहा, शहा कोव्हिड हेल्थ सेंटर 10 बेड, डॉ. शेलार, शेलार कोव्हिड हेल्थ सेंटर 10 असे कोव्हिड हेल्थ सेंटरच्या मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. उपजिल्हा रुग्णालयात 7 बेड असल्याचे ढुकरे यांनी सांगितले. 

कोरोना रोखण्यासाठी टेस्टिंग वाढवीत आहोत. सर्वाना टेस्टिंगचे आवाहन आहे. यापुढे प्रशासकीय इमारतीत येताना सर्वांचे टेस्टिंग केले जाईल. त्याशिवाय त्यांना शासकीय कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही. कोरोना चेन ब्रेक कार्यक्रमानुसार कडक उपाययोजना केले जाणार आहेत. 
- समीर माने, 
तहसीलदार, करमाळा 

कोरोना उपचारासाठी होणारा खर्च सर्वसामान्यांना परवडणारा नाही. त्यामुळे कमीत कमीत खर्चात उपचार मिळण्याच्या दृष्टीने माफक दरात कोरोनावर उपचार होण्यासाठी सर्व कोव्हिड सेंटर्सना प्रशासनाने सूचना कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT