election 
सोलापूर

कोरवली ग्रामपंचायत बिनविरोधचा बार फुसका ! पॅनेलप्रमुखांची जोरदार मोर्चेबांधणी 

श्रावण तीर्थे

कोरवली (सोलापूर) : मोहोळ तालुक्‍यातील कोरवलीची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याबाबत कामती पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी मागील महिन्यात आवाहन केले होते. त्यानुसार त्या वेळी बिनविरोधचे वातावरण निर्माणही झाले होते. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीची घोषणा होताच तिन्ही पॅनेल प्रमुखांनी निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरवात केल्याने कोरवली ग्रामपंचायतीचा बार फुसकाच निघाला. 

मागील महिन्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी ग्रामपंचायत कार्यालयात गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील सर्व पक्षांचे प्रमुख नेते, गावातील ज्येष्ठ नागरिक यांची एकत्र बैठक बोलावून गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार गावातील राजशेखर पाटील, डॉ. अमोल पाटील, सिद्धाराम म्हमाणे या तिन्ही पॅनेल प्रमुखांनी गावचे माजी सरपंच व ज्येष्ठ नेते चनबसवेश्वर म्हमाणे यांच्या अध्यक्षतेखाली उमेदवार निवडून निवडणूक बिनविरोध करण्याचे आश्वासन दिले होते. कोरोनामुळे लॉकडाउन व अतिवृष्टीमुळे नुकसानीस सामोरे जाणाऱ्या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होणार असल्याने अनेकजण निश्‍चिंत होते. 

मात्र निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करताच तिन्ही पॅनेल प्रमुखांनी निवडणुकीची जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. योग्य उमेदवाराची चाचपणी, आरक्षित जागेवर उभारणाऱ्या उमेदवाराची कागदपत्रे जमा करणे तसेच स्वतंत्र बैठका घेण्याचे काम चालू केले आहे. त्यामुळे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांचा सल्ला केवळ नावापुरताच मानला होता की काय, असेच म्हणावे लागेल. 

गावचा विकास थांबवण्यासाठी अंतर्गत वाद कारणीभूत असतात. ग्रामपंचायत निवडणुकांमुळे गावात गटबाजी निर्माण होऊन भांडणे होतात, त्यामुळे गावाचा विकास थांबतो. त्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यास गावाच्या विकासाला चालना मिळेल. निदान कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तरी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी, असे गावातील सर्वसामान्यांचे मत आहे. 

निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मी प्रयत्न केला, पण गावातील अंतर्गत वादामुळे यश आले नाही. शेवटी लोकशाहीत सर्वांना निवडणूक लढवण्याचा हक्क आहे. 
- अंकुश माने, 
सहाय्यक पोलिस निरीक्षक, कामती पोलिस ठाणे 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT