सोलापूर

सोलापुरात दुचाकी चोरणारे तीन तरुण अटकेत 

सकाळवृत्तसेवा

सोलापूर  : घरी अथवा घराबाहेर कोणी नसल्याची संधी साधून दुचाकी चोरणाऱ्या तीन तरुणांना विजापूर नाका पोलिसांनी जुळे सोलापुरातील रेणुका मंगल कार्यालयाजवळ पकडले. त्यांच्या ताब्यातून पाच दुचाकी (किंमत अंदाजे एक लाख 10 हजार रुपये) पोलिसांनी हस्तगत केल्या. 
चोरी केलेल्या दुचाकीला ऑटोरिक्षाची नंबर प्लेट बसवून शहरात हे तिघेही फिरत असत. मंगळवारी (ता. 2) हे तिघेही जुळे सोलापुरातील एका मंगल कार्यालयाजवळ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक भीमराव पाटील, अमित शेटे आणि पोलिस कर्मचारी श्रीरंग खांडेकर, रोहन ढावरे, मिथुन चव्हाण, विशाल बोरोडे, लखन माळी यांचे पथक त्याठिकाणी पोचले. सापळा रचून पोलिसांनी रेकॉर्डवरील त्या सराईत गुन्हेगारांना पकडले. आकाश बाबू वाजपे (वय 20), बापू बबन पवार (वय 20), आकाश राजू भांडेकर (वय 19) यांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याजवळील दुचाकीलाही ऑटोरिक्षाचाच क्रमांक होता. ती दुचाकी त्यांनी अंत्रोळीकर नगर येथून डुप्लिकेट चावी लावून पळविल्याचेही कबूल केले. 

मंगळवेढ्यात दारू जप्त 
मंगळवेढा  : मंगळवेढा ते खोमनाळ रस्त्यावरील डी.बी.एल कंपनीच्या समोर लिंबाच्या झाडाखाली बेकायदेशीर दारू विक्री करत असताना एकास अटक करून नऊ हजार 880 रुपयांच्या 180 मिलीच्या 190 बाटल्या हस्तगत केल्या आहेत. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल रफिक तांबोळी यांनी फिर्याद दिली असून प्रवीण ज्ञानेश्‍वर नायकवडी (वय 35, रा. मुजावर गल्ली, मंगळवेढा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 

होम क्वारंटाइन व्यक्तींवर करमाळ्यात गुन्हा 
करमाळा : करमाळा तालुक्‍यात होम क्वारंटाइन केलेल्या व्यक्ती त्याच ठिकाणी राहतात की नाही याची तपासणी केल्यानंतर क्वारंटाइन केलेल्या ठिकाणी राहत नसलेल्या सहा जणांवर करमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 
सरकारने बाहेरगावातील नागरिकांना पास काढून गावी जाण्यास सवलत दिली. त्याप्रमाणे करमाळा तालुक्‍यात पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नगर येथून अनेक नागरिक आले आहेत. त्यांना ग्राम आपत्ती व्यवस्थापन समितीकडून होम क्वारंटाइन व इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन केले जात आहे. त्यानुसार क्वारंटाइन झालेल्यांनी दिलेल्या कालावधीत त्याच ठिकाणी राहणे आवश्‍यक आहे. करमाळा पोलिस ठाण्याकडील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी करमाळा तालुक्‍यातील 21 गावे व शहरातील आठ वॉर्डमधील क्वारंटाइन केलेल्या नागरिकांची तपासणी केली. तेव्हा वंजारवाडी, खातगाव नंबर दोन, जेऊर व मलवडी या चार गावांतील व्यक्ती क्वारंटाइन केलेल्या ठिकाणी न राहता इतरत्र सापडल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी दिली. 
करमाळा तालुक्‍यात काही बाहेरून लोक आले आहेत. त्यापैकी सुमारे 80 टक्के लोक पुणे-मुंबईसारख्या रेड झोनमधून आले असून हे लोक क्वारंटाइनचे नियम पाळत नाहीत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना करमाळा पोलिसांना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

Pune Ahilyanagar Road: वाघोली गणेश विसर्जन २०२६; पुणे-अहिल्यानगर रोडवरील वाहतूक बदल, पर्यायी मार्ग आणि बाजार बंदची माहिती

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

Indian Economy: अर्थव्यवस्थेला नवा वेग

SCROLL FOR NEXT