1Pan_Tapri - Copy.jpg 
सोलापूर

मोठी ब्रेकिंग! शहरातील पान टपऱ्या सुरु करण्यास परवानगी; 'या' नियमांचे पालन बंधनकारक 

तात्या लांडगे

सोलापूर : कोरोना संसर्ग कमी करण्याच्या हेतूने जाहीर केलेल्या कडक संचारबंदीनंतर आता टप्प्याटप्याने विविध लघू व मोठे उद्योग, व्यवसाय सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर सोलापूर शहरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी परवानगी दिली आहे. सकाळी नऊ ते रात्री सात वाजेपर्यंत पान टपऱ्या सुरु राहतील. मात्र, त्यांना टपरीबाहेर धुम्रपान करु नये, असे फलक लावणे बंधनकारक असणार आहे. 

आदेशातील ठळक बाबी... 

  • सकाळी नऊ ते रात्री सात वाजेपर्यंत सुरु राहणार पान टपऱ्या 
  • दुकानदार-ग्राहकांना मास्क बंधनकारक; थुंकण्यासही मनाई 
  • पान टपरीधारकांना दुकानाबाहेर धुम्रपानाबद्दल फलक लावणे बंधनकारक 
  • दरवाजे, हॅण्डल स्वच्छ व सॅनिटाईज करणे सक्‍तीचे 
  •  

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या पान टपऱ्या सुरु करण्यास परवानगी मिळाली. मात्र, त्यांच्याकडे सक्षम प्राधिकरणाकडील परवाने असणे सक्‍तीचे आहे. ठरवून दिलेल्या वेळेतच पान टपऱ्या सुरु आणि बंद होतील, असेही आयुक्‍त शिवशंकर यांनी स्पष्ट केले आहे. ग्राहकांमध्ये किमान सहा फुटांचे अंतर असावे, पान टपरीसमोर गर्दी दिसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. टपरीसमोर तथा सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई करण्यात आली असून तसे फलक पान टपरीधारकांनी लावावेत, असेही आयुक्‍तांनी त्यांच्या आदेशात नमूद केले आहे. ग्राहक आणि पान टपरी चालकाने मास्क घातलेले असावे, अशा सक्‍त सूचना महापालिका आयुक्‍तांनी दिल्या आहेत. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी प्रभावीपणे होईल का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT