today is zero shadow day in Solapur study  Sakal
सोलापूर

सोलापुरात आज शून्य सावली दिवस; वर्षात दोनवेळाच अशी स्थिती; खगोलप्रेमींना निरीक्षणाची संधी

शून्य सावली दिवस हा प्रसंग वर्षातून दोनच वेळा येते. नेहमी आपल्या सोबत राहणारी आपली सावली काही मिनिटांसाठी आपल्याला सोडून जाते.

सकाळ डिजिटल टीम

Solapur News : शून्य सावली दिवस हा प्रसंग वर्षातून दोनच वेळा येते. नेहमी आपल्या सोबत राहणारी आपली सावली काही मिनिटांसाठी आपल्याला सोडून जाते. महाराष्ट्रात ३ ते ३१ मेपर्यंत असे शून्य सावली दिवस सुरू आहेत. शुक्रवारी (ता. १०) सातारा, पंढरपूर व सोलापूर येथे शून्य सावली दिवस आहे.

सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या २३.५० अक्षांश दक्षिण आणि उत्तरेकडे असतो. म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्त यादरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षांतून दोनदा दुपारी डोक्यावर येतो आणि दोनदा शून्य सावली दिवस येतात.

सूर्य आणि पृथ्वी यातील कोनीय व्यास आणि अंशात्मक अंतर जिथे जुळते, तिथे शून्य सावली दिवस घडतो. उत्तरायण होताना एकदा आणि दक्षिणायण होताना एकदा तसेच सूर्य दररोज ०.५० अंश सरकतो म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर दोन दिवस राहतो. त्यामुळे एकाच ठिकाणावरून दोन दिवस शून्य सावली अनुभवता येते. महाराष्ट्रात ३ ते ३१ मे पर्यंत विविध दिवशी शून्य सावली दिवस आहेत.

सूर्य निरीक्षणाची संधी

एका अक्षांशवर येणाऱ्या सर्व परिसरात त्याच दिवशी शून्य सावली दिवस येतात. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या अक्षवृत्तावर वेगळे दिवस आणि वेळा आहेत, त्यामुळे सर्व शहरे आणि गावांच्या वेळात काही सेकंदांचा फरक आहे. त्यामुळे आपण दुपारी १२ ते १२.३५ दरम्यान सूर्य निरीक्षण करावे. समूहासाठी उपक्रम करायचा असेल तर मोकळ्या जागी आणि कौटुंबिक निरीक्षण करायचे असेल तर घराच्या छतावर किंवा अंगणात केले तरी चालेल, असे ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.

शून्य सावली दिवस व ठिकाण

  • ९ मे - चिपळूण, अक्कलकोट

  • १० मे - सातारा, पंढरपूर, सोलापूर

  • ११ मे - महाबळेश्वर, फलटण, तुळजापूर, वाई

  • १२ मे - बारामती, बार्शी, धाराशिव

भारतीय ज्योतिर विज्ञान परिषद म्हणजेच ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया यांनी सूचित केलेल्या ‘झिरो शॅडो डे’ यापूर्वी प्रसिद्ध केल्या आहेत. सूर्योदय व सूर्यास्ताच्या बरोबर मधल्या वेळेत ही स्थिती येते. यावेळी सूर्य निरीक्षण करता येते.

- डॉ. विनायक धुळप, संचालक, भूशास्त्र संकुल, सोलापूर विद्यापीठ

स्थळाचे अक्षांश व सूर्याचे क्रांती एक होण्याची प्रक्रिया ज्या दिवशी ज्यावेळेस घडते तो शून्य सावलीचा दिवस होय. सूर्याची क्रांती म्हणजे तारका व ग्रह यांच्यातील कोनात्मक अंतराला क्रांती, असे म्हणतात.

- डॉ. शिवराय आडवीतोट,

प्राचार्य, सीबी खेडगी महाविद्यालय अक्कलकोट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! या 10 मागण्या मान्य झाल्यास पगारात आणि पेन्शनमध्ये होणार बंपर वाढ

भररस्त्यात वाघाला घेरलं, नंतर जवळ जाऊन...; ताडोबातील धक्कादायक प्रकार, गुन्हा दाखल

काळजाला भिडणारी घटना! ज्या वडिलांनी हात धरून चालायला शिकवलं, त्यांनाच पोत्यात भरून पार्सल करण्याचा मुलीचा प्रयत्न; पाहा व्हिडिओ

Latest Marathi News Live Update : पंढरपूर येथील सांगोला पेपर चोरी प्रकरण; दोन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Pune Zp Election : पुणे जिल्हा परिषदेत आंबेगावला पुन्हा मान; वळसे पाटील कुटुंबाची परंपरा कायम, उपाध्यक्षपदी दुसऱ्यांदा विवेक वळसे पाटील

SCROLL FOR NEXT