sakal_Tomato 
सोलापूर

कवडीमोल दरामुळे टोमॅटोचा होतोय शेतातच लाल चिखल ! कोबीचेही दर गडगडले 

राजाराम माने

केत्तूर (सोलापूर) : भाजीपाल्यातील टोमॅटो पिकांना बाजारात सध्या एक ते दोन रुपये अशाप्रकारे नीचांकी दर मिळत असल्याने टोमॅटो उत्पादकांना उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे योग्य दराअभावी शेतातच टोमॅटोचा चिखल झाल्याचे पाहावयास मिळत आहे. 

पोमलवाडी (ता. करमाळा) येथील युवा शेतकरी रोहित मगर यांनी दोन पैसे होतील या आशेने आपल्या अर्धा एकर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड केली. वारंवार बदलणाऱ्या हवामानामुळे रोगराईपासून पीक वाचण्यासाठी पिकावर सतत औषध फवारणीही केली. चांगल्या उत्पन्नाच्या आशेवर त्यांनी भला मोठा खर्च केला. झाडेही फळांनी लगडली. परंतु सध्या मार्केटमध्ये टोमॅटो एक रुपया ते दोन रुपये किलो याप्रमाणे विकला जात असल्याने टोमॅटो मार्केटला नेणेही परवडत नाही. त्यामुळे त्यांनी संपूर्ण पीक शेतात सोडून दिले आहे. त्यामुळे शेतात मात्र टोमॅटोचा लाल चिखल झाला आहे. 

गतवर्षी अशाच प्रकारची परिस्थिती पाहावयास मिळाली होती. कोरोना महामारीमुळे लॉकडाउनमध्ये वाहतूक व मार्केट बंद असल्याने शेतातील तयार पिके बाजारात विकता आली नाही. त्या वेळीही मोठा आर्थिक फटका बसला होता. 

टोमॅटो पाठोपाठ कोबी पिकालाही उतरत्या दराचा सामना करावा लागत असून, कोबी पिकाने सध्या नीचांकी दर गाठला आहे. केवळ एक रुपया दराने कोबीची विक्री होत आहे. वारंवार बदलणाऱ्या हवामानामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी पिके वाचवण्यासाठी खर्च करूनही समाधानकारक दर मिळत नसल्याने पुन्हा एकदा आर्थिक कोंडीत सापडला आहे. त्यातच कोरोनाचे संकट पुन्हा एकदा घोंगावू लागल्याने पुन्हा एकदा लॉकडाउन होते की काय? याच भीतीने शेतकरी मात्र हबकून गेला आहे. 

एक वेगळा प्रयोग म्हणून टोमॅटोची लागवड केली. चांगला दर मिळेल अशी आशा होती. त्यामुळे खर्चही केला. परंतु सध्या बाजारात टोमॅटोला दरच नसल्याने तो मातीमोल दराने विकावा लागत आहे. या दरात केलेला खर्चही निघणे अवघड झाल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे टोमॅटो शेतातच सोडून दिले आहेत. 
- रोहित मगर, 
शेतकरी, पोमलवाडी 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खरातचा सीए माफीचा साक्षीदार बनणार? खरातविरोधातच दिलीय तक्रार, शेकडो कोटी परदेशात पाठवले, कोण आहे ललित पोफळे?

MI vs KKR Toss Fixing? मुंबई इंडियन्सवर 'फिक्सिंग'चा आरोप, टॉसच्या वेळी हार्दिकने काय केले पाहा; नेटकऱ्यांनी घेतली शाळा Video Viral

Pune Palkhi halt change: पुण्यातील भवानी पेठेतील पालखी मुक्काम बदलण्याचा विचार; अंतिम निर्णय १३ एप्रिलला जाहीर होणार

Mohol Teachers Felicitation: मोहोळ तालुक्यातील १९ शिक्षकांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर; उद्या श्रीक्षेत्र वडवळ येथे मान्यवरांच्या हस्ते वितरण

MI vs KKR Live: अजिंक्य रहाणेची आक्रमक खेळी; मुंबईच्या मदतीला 'लॉर्ड' शार्दूल धावला, तरीही KKR ने उभे केले आव्हानात्मक लक्ष्य

SCROLL FOR NEXT