Amalki Ekadashi 
सोलापूर

आमलकी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात एक टन फुले व शंभर किलो द्राक्षांची मनमोहक आरास !

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : आमलकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिरात आज विविध प्रकारची आकर्षक एक टन फुले आणि 100 किलो द्राक्षांनी मनमोहक आरास करण्यात आली आहे. याबाबत श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी यांनी माहिती दिली. 

विविध सण, उत्सव यानिमित्ताने श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिरात रंगीबेरंगी फुले आणि त्या काळामध्ये उपलब्ध असलेली फळे यांचा वापर करून मनमोहक आरास केली जात असते. त्यानुसार आज आकर्षक फुलांच्या बरोबरच द्राक्ष वेली आणि द्राक्षांचे घड सजावटीसाठी वापरण्यात आले. 

रांजणगाव येथील श्री विठ्ठलभक्त नानासाहेब दिनकरराव पाटील यांनी आज फुलांची आरास करण्यासाठी झेंडू, शेवंती, आरकेड, आथेरियम अशी विविध प्रकारची सुमारे एक टन फुले उपलब्ध करून दिली. त्याशिवाय शंभर किलो द्राक्ष आणि केळीचे खुंट वापरून श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिरातील गाभाऱ्यात आणि मंदिरातील अन्य भागात सुरेख सजावट करण्यात आली आहे. रंगीबेरंगी फुले, द्राक्ष वेली आणि द्राक्ष घडांच्या मधील विठुरायाचे साजिरे रूप अधिकच खुलून दिसत आहे. 

शिंदे ब्रदर्स साई डेकोरेटर्स आणि श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर समिती कर्मचाऱ्यांनी फुले आणि द्राक्षांची सजावट करण्याचे काम केले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT