abortion sakal
सोलापूर

काकाकडूनच अत्याचार! पीडिता २४ आठवड्यांची गर्भवती; न्यायालयाची गर्भपातास परवानगी

पोटात दुखू लागल्याने अल्पवयीन मुलीच्या पालकांनी तिला हॉस्पिटलमध्ये दाखवले. त्यावेळी डॉक्टरांचा रिपोर्ट पाहून पालकांना धक्काच बसला. मावशीच्या नवऱ्यानेच त्या पीडितेवर सतत अत्याचार केल्याने ती तब्बल २४ आठवडे एक दिवसाची गर्भवती राहिली होती.

तात्या लांडगे

सोलापूर : पोटात दुखू लागल्याने अल्पवयीन मुलीच्या पालकांनी तिला हॉस्पिटलमध्ये दाखवले. त्यावेळी डॉक्टरांचा रिपोर्ट पाहून पालकांना धक्काच बसला. मावशीच्या नवऱ्यानेच त्या पीडितेवर सतत अत्याचार केल्याने ती तब्बल २४ आठवडे एक दिवसाची गर्भवती राहिली होती. गर्भपाताला परवानगी मिळावी म्हणून विधी सेवा प्राधिकरणाने पीडितेला मदत केली. शनिवारी (ता. २४) पीडितेला उच्च न्यायालयातून गर्भपाताला परवानगी मिळाली.

सोलापुरातील एका १४ वर्षीय मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिच्या पालकांनी ४ डिसेंबर रोजी तिला विमा रुग्णालयात आणले. तेथील डॉक्टरांनी त्या अल्पवयीन मुलीची तपासणी केली. त्यावेळी ती २४ आठवड्यांपासून गर्भवती असल्याची बाब समोर आली. पालकांनी तिला विश्वासात घेऊन हकीकत विचारली, त्यावेळी काकाने वेळोवेळी अत्याचार केल्याचे तिने पालकांना सांगितले. काकाविरुद्ध ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पीडितेचे वय लहान आहे व मुलाला जन्म देण्यासाठी ती सक्षम नसल्याने तिचा गर्भपात महत्त्वाचा होता. पालकांनी तेथील डॉक्टरांना गर्भपात करण्याची विनंती केली. पण, त्यासाठी न्यायालयाची परवानगी लागते, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले. त्यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून मदत घेण्याचा निर्णय घेतला.

दहा दिवसांत गर्भपातास मंजुरी

पीडितेच्या पालकांनी १४ डिसेंबर रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यालय गाठले. प्रमुख जिल्हा न्यायाधीश डॉ. शब्बीर औटी, सचिव नरेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राधिकरणाचे रिटेनर लॉयर देवयानी किणगी यांनी उच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीकडे पीडितेची वैद्यकीय कागदपत्रे, पोलिसांतील फिर्याद सादर केली. ॲड. सलोनी घुले यांनी पीडितेची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली. २४ डिसेंबर रोजी तिला न्यायालयाने गर्भपातास परवानगी दिली. पीडितेच्या पालकांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातील अधिकाऱ्यांचे आभार मानले.

विधी सेवा प्राधिकरण सर्वसामान्यांचा आधार

सर्वसामान्य अन्यायग्रस्तांचा आधार म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण प्रमुख जिल्हा न्यायाधीश डॉ. शब्बीर औटी यांच्या मार्गदर्शनाखाली सक्षमपणे काम करीत आहे. प्राधिकरणाने काही महिन्यांत शेकडो अन्यायग्रस्तांना मोफत न्याय मिळवून दिला आहे.

- नरेंद्र जोशी, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

Dr. Ratnakar Mahajan Pass Away: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन; महाराष्ट्रातील पुरोगामी, वैचारिक चळवळीतील अभ्यासू आवाज हरपला

Marathi News Live Updates: स्वच्छता साहित्यासाठी डीबीटी अशक्य, स्थायी समितीसमोर फेरप्रस्ताव

Karad Chain Snatching: रेकॉर्डवरील गुन्हेगारावर ‘जॅक’ पडला भारी; कऱ्हाडमध्ये उसातून शोधला सोनसाखळी चोर, श्वानाने काढला माग

SCROLL FOR NEXT