bajra farming  sakal
सोलापूर

Agriculture: बाजरी पिकाला आले चार फुटाचे कणीस; शेतकऱ्यांचा प्रयोग यशस्वी

विनोद देशमुख

बाजरी तसे पारंपरिक पीक सर्वांनीच अनुभवले, पण आजवर आपण साधारण फूटभर लांब कमीच पाहिले असेल मात्र सांगोला तालुक्यातील कोळा येथील राहुल वाले शेतकऱ्याने पेरलेल्या बाजरीला तब्बल चार फुटापर्यंत लांबीचे कणीस लागल्याने ही आश्चर्यकारक बाब परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.

शेतकरी वर्ग पारंपारिक पिकाकडे पाठ फिरवून नगदी पिकाकडे वळाला असताना , आता पारंपारिक पिकातही नवनवीन प्रयोग होऊ लागले आहेत सांगोला तालुक्यातील कोळा येथील शेतकरी राहुल वाले यांनी लावलेल्या बाजरीला तीन ते चार फुटापर्यंत कणीस लागल्याने ते पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे.

राजस्थान वरून पोस्टाने एक हजार रुपये किलो दराने बाजरीचे गावठी बियाणे आणून त्याची आपल्या शेतात पेरणी केली होती यंदा पर्जन्यमान चांगले झाल्याने पीक चांगले जोमात आले बहरलेल्या बाजरीला तब्बल तीन ते चार फुटापर्यंत कणीस लागल्याचे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

वाले यांनी 20 गुंठ्यात ही बाजरी घेतली असून त्यातून उत्पन्न चांगले निघेल असा अंदाज आहे नियमित करण्यात येणाऱ्या बाजरी पिकापेक्षा तिपटीने जास्त उत्पादन बाजरी पीक देते असा दावाही वाले यांनी केला.

बाजरी बियाण्याची जात तुर्की असून कंसाची लांबी 4 ते 5 फूट आहे. वीस गुंठ्यात अर्धा किलो बियाणे लागले विशेष म्हणजे यासाठी मोजकीच खते त्यासाठी वापरले आहेत .

तुर्की जातीच्या बाजरीत उष्णता कमी

आपल्या भागातील बाजरी व तुर्की जात असलेल्या बाजरी मध्ये फरक असल्याचा वाले यांनी सांगितले. तुर्की जात असलेल्या बाजरीमध्ये उष्णता कमी प्रमाणात असल्यामुळे ही बाजरी मुळव्याध व शुगर असलेल्या नागरिक खाऊ शकतात.

मी राजस्थान वरून एका शेतकऱ्याकडून पोस्टाने बाजरीचे बियाणे मागवले होते मी वीस गुंठ्यात अर्धा किलो बियाने पेरले असून व या बाजरीला किरकोळ खते वगळता फक्त पाणीच दिले आहे सध्या माझ्या शेतात तीन ते चार फुटाचे कणीस लागले असून हा प्रयोग मी प्रथमच केला आहे

राहुल वाल, शेतकरी, कोळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT