Chandrabhaga 
सोलापूर

पंढरपुरातील ठिकठिकाणचे पूल पाण्याखाली ! भंडीशेगावच्या नवीन पुलाचा भाग गेला वाहून; वाहतूक ठप्प

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर, सांगोला, माळशिरस भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणच्या पुलांवर पाणी आल्याने पंढरपूर-वेळापूर, पंढरपूर-सातारा आणि पंढरपूर - मंगळवेढा या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पंढरपूरकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक टेंभुर्णी मार्गे सुरू आहे तर सातारा आणि मंगळवेढा मार्गावरील एसटी वाहतूक थांबवण्यात आली आहे. पंढरपूर- वेळापूर दरम्यान भंडीशेगाव गावाजवळ 2011-12 च्या सुमारास बांधलेल्या पुलाचा भाग वाहून गेला आहे. 

उजनीतून भीमा नदीत 30 हजार क्‍युसेक पाणी सोडण्यात येत असल्याने भीमा नदीची पातळी देखील वाढू लागली आहे. पंढरपूर, माळशिरस आणि सांगोला तालुक्‍यात दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणच्या पुलांवर पाणी आले आहे. पंढरपूर - वेळापूर दरम्यान भंडीशेगाव गावाजवळ 2011-12 मध्ये नवीन पूल बांधण्यात आला होता. त्या पुलावर काल शुक्रवारी रात्री सुमारे चार ते पाच फूट पाणी आल्याने पुलाचा काही भाग वाहून गेला आहे. त्यामुळे पंढरपूरहून वेळापूर मार्गे पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद पडली आहे. 

पंढरपूर- सातारा रस्त्यावरील उपरी गावाजवळील पुलावर पाणी आल्याने हा रस्ता देखील शुक्रवारी रात्रीपासून वाहतुकीसाठी बंद झाला. त्यामुळे पंढरपूरहून साताराकडे सध्या एसटी गाड्या जाऊ शकत नाहीत. 

पंढरपूर - मंगळवेढा दरम्यान सिद्धेवाडी गावाजवळ माण नदीवरील पुलावर आज पहाटे पाणी आल्याने पंढरपूरहून मंगळवेढ्याकडे जाणारी सर्व वाहतूक थांबवण्यात आली आहे. प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली. 

पुलावर पाणी आल्याने पंढरपूरहून सातारा आणि मंगळवेढ्याकडे जाणारी एसटी वाहतूक थांबवण्यात आली असून, पुण्याकडे टेंभुर्णी मार्गे एसटी सोडण्यात येत आहेत, अशी माहिती एसटीचे आगार प्रमुख सुधीर सुतार यांनी दिली. 

दरम्यान, उजनी धरणातील पाण्याची पातळी वाढल्याने उजनीतून भीमा नदीत 30 हजार क्‍युसेक पाणी सोडण्यात येऊ लागले आहे. त्यामुळे पंढरपूर येथील भीमा नदीची पातळी वाढत असून, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup : एका राजाने निवडला संघ... खेळाडूंवरील गुन्हे माफ अन् इंग्लिश तेल कंपनी बंद पाडण्याची धमकी; १९३० च्या वर्ल्ड कपचा रंजक किस्सा तुम्ही ऐकला नसेल...

Donald Trump Team Split: इराण करारावरून ट्रम्प यांच्या प्रशासनात फूट; सीआयएच्या गुप्त अहवालामुळे अमेरिकेची उडाली झोप

Broiler Chickens Death : एका रात्रीत पोल्ट्रीमधील सुमारे 3600 बॉयलर कोंबड्यांचा अचानक मृत्यु; सुमारे सात लाखाचे नुकसान, उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज

Jawan Pravin Avhade : कन्यारत्नाच्या आनंदावर विरजण; जवान प्रवीण आव्हाड यांचे अपघाती निधन

Bhiwandi: भिवंडी महापालिकेच्या २४ उमेदवारांना नोटीस, निवडणुकीचा हिशोब न दिल्याने कारवाई

SCROLL FOR NEXT