tragic incident occurred in Mohol farmer died due to an electric shock sakal
सोलापूर

Mohol News : इलेक्ट्रिक शॉक लागून एका शेतकऱ्याचा मृत्यू; मोहोळ तालुक्यातील घटना

Solapur Latest Marathi News | बोअरची मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या एका 32 वर्षीय शेतकऱ्याचा इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना राम हिंगणी ता मोहोळ येथे ता 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता घडली. राजवर्धन नारायण पाटील रा राम हिंगणी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

राजकुमार शहा

मोहोळ : बोअरची मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या एका 32 वर्षीय शेतकऱ्याचा इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना राम हिंगणी ता मोहोळ येथे ता 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता घडली. राजवर्धन नारायण पाटील रा राम हिंगणी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

मोहोळ पोलिसां कडून मिळालेल्या माहिती नुसार, बुधवार ता 2 ऑक्टोबर रोजी राजवर्धन पाटील हे रामहिंगणी येथील शेतात राहतात. राजवर्धन हे मका व ज्वारीच्या पिकाला पाणी देण्यासाठी म्हणून बोअरची मोटर चालू करण्यासाठी गेले असता त्यांना पेटीचा इलेक्ट्रिक शॉक लागला व ते जागीच कोसळले. ही घटना राजवर्धन यांचे भाऊ हर्षवर्धन यांना त्यांच्या भाऊजई ने पळत येऊन सांगितली.

त्यावेळी हर्षवर्धन यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता भाऊ राजवर्धन हा पेटी जवळ पडलेल्या अवस्थेत दिसून आला. तातडीने त्याला रुग्णवाहिकेत उपचारासाठी मोहोळ येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात आणले असता तेथील डॉक्टरांनीही तपासून मृत घोषित केले. या घटनेची खबर हर्षवर्धन नारायण पाटील वय 36 रा राम हिंगणी यांनी मोहोळ पोलिसात दिली असून तपास मोहोळ पोलीस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan Parishad Election : अंबादास दानवेंसाठी काँग्रेसनं घेतली माघार; ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा देताना 'मविआ'मध्ये नक्की कोणती झाली 'डील'?

Artificial Mango Ripening : सावधान! तुम्ही खाल्लेला आंबा नैसर्गिक की केमिकलने पिकवलेला? 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

Love Numerology : प्रेमात पक्के 420 असतात 'या' 3 मुलांकाचे लोक; तुमच्या पाठीत कधी खंजीर खुपसतील कळणारही नाही

Latest Marathi News Live Update : पाषाण तलावातील मृत मासे प्रकरण! महापौरांचा दौरा, प्रदूषण रोखण्यासाठी तातडीचे आदेश

India Census 2026 : राज्यात १ मे पासून जनगणना, विचारले जाणार 'हे' प्रश्न; चुकीची माहिती दिल्यास होणार तब्बल 'इतका' दंड

SCROLL FOR NEXT