logo 
सोलापूर

खासगी रुग्णालयात उपचार, सोलापुरातील  कोणत्याही रुग्णांची होणार नाही गैरसोय 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोविड-नॉन कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सर्व डॉक्‍टर आणि कर्मचारी सज्ज आहेत. रुग्णांवर उपचार करण्यासाठी सोलापुरातील खासगी रुग्णालयांची मदत घेतली जात आहे. कोणत्याही रुग्णाची गैरसोय होऊ देणार नसल्याची माहिती सोलापुरातील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी दिली. 

सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचनेनुसार योग्य ती कार्यवाही सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात अडीच ते तीन महिन्यापूर्वी कोविड वॉर्ड तयार केलेला आहे. त्यामध्ये 115 बेडची सोय आहे. त्यामध्ये पंधरा बेड आयसीयुचे होते. आता त्याची क्षमता 50 पर्यंत वाढवली आहे. बेड अपुरे पडत असतील तर त्यासंदर्भात डॅशबोर्ड तयार केला आहे. 

कोणत्याही पेशंटला दाखल करून घेण्यासाठी दिरंगाई होऊ देणार नाही. जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनानुसार खासगी दवाखान्यांचीही मदत घेण्यात येत आहे. काही रुग्णांना खासगी दवाखान्यात दाखल केले जात आहे. त्यामुळे रुग्णांवर अतिशय व्यवस्थितरीत्या उपचार सुरू आहेत. सोलापूरकरांनी कोणत्याही परिस्थितीत घाबरून जाऊ नये. स्वतःची काळजी घ्यावी. आम्ही तुमची काळजी घेण्यासाठी सज्ज आहोत, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT