doctor.jpg 
सोलापूर

कोरोना रुग्णांच्या स्थितीवरून ठरतील उपचाराचे निर्णय 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूरः आरोग्य खात्याने आता रुग्णांचे वर्गीकरण करून त्यांना विवीध संस्थात्मक उपचारासोबत होम क्वारंटाईन करण्याबाबत देखील नव्याने सुचना दिल्या आहेत. त्यामध्ये होम क्वारंटाईनसाठी विशेष प्रतिज्ञापत्र भरुन घेण्यात येणार आहेत. 

शासनाच्या आरोग्य खात्याने अल्प लक्षणे असलेली किंवा नसलेल्या संशयित कोरोना रुग्णांसाठी गृह विलगीकरणाची पद्धत जाहीर केली असून त्यामध्ये संशयितास ट्रिपल लेअर मास्क, द्रव खाद्यपदार्थ देण्याचे सुचवले आहे. आरोग्य खात्याचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास यांनी शनिवारी (ता. 6) याबाबतचे आदेश काढले आहेत. त्यामध्ये ज्या संशयितास अल्प स्वरूपाची लक्षणे आहेत त्यांना गृह विलगीकरण करता येणार आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रमाणीत केल्यानंतर ही प्रक्रिया केली जाईल. काळजीवाहू व कुटुंबातील व्यक्तीस डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार हायड्रॉक्‍सी क्‍लोरोक्विलची मात्रा घ्यावी लागणार आहे. 
ज्या नागरिकांकडे स्वतंत्र खोली व काळजीवाहू नातेवाईक असेल तेथे त्यांना गृह विलगीकरण करता येईल. यामध्ये सर्वाधिक महत्त्व तीन पदरी मास्कला देण्यात आले आहे. हा मास्क संशयित व त्यांच्या नातेवाइकांनी वापरणे बंधनकारक असणार आहे. संसर्गाच्या दृष्टीने हा मास्क सर्वांत सुरक्षित मानला जातो. तसेच रुग्णांना चेहऱ्याला स्पर्श करू देऊ नये. काळजीवाहू व्यक्तीला आरोग्य सेतू ऍप डाउनलोड करून घ्यावे लागणार आहे. संशयितास खोलीच्या बाहेर जाऊ देऊ नये. मधुमेहाचे रुग्ण,जेष्ठ नागरिक व इतर आजाराच्या व्यक्तीना दुर ठेवावे. 

हेही वाचाः चेस द व्हायरस... 

संबंधित संशयितास आवश्‍यक ते प्रतिज्ञापत्र लिहून द्यावे लागणार आहे. संशयितास लक्षणे दिसल्यानंतर 17 दिवसांनंतर गृह विलगीकरण करता येणार आहे. तसेच ताप नसल्यानंतर 10 दिवसांनी गृह विलगीकरणातून संशयितास मुक्त करता येणार आहे. अशा संशयिताची पुन्हा कोरोना चाचणी घेण्याची आवश्‍यक्ता नाही. आता रुग्ग्णांचे तीन प्रकारात वर्गीकरण केले जाणार आहे. यामध्ये लक्षण नसलेले रुग्ण, सौम्य लक्षणे असलेले रुग्ण, मध्यम व तीव्र लक्षणाचे रुग्ण या पध्दतीने वर्गवारी होईल. त्यानुसार या रुग्णांना पहील्या दोन प्रकारातील म्हणजे लक्षणे नसणे किंवा सौम्य लक्षणे असलेल्यांना गृह विलगीकरण करता येणार आहे. इतर रुग्णांचे वर्गीकरण कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड सेंटर व कोविड हॉस्पिटलमध्ये केले जाणार आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak: 'नीट पेपर लीक' प्रकरणात सीबीआयकडून चार्जशीट दाखल; शिवराज मोटेगावकरसह 13 आरोपींचा समावेश

Pune Online Toy Car Scam: टॉय कारच्या ऑनलाइन खरेदीत शिवाजीनगरातील महिलेची पावणेचार लाखांची फसवणूक

Shraddha Chopde: 'ज्युदोच्या मॅट'वर शेतकरी कन्येचा सुवर्ण हुंकार! महाराष्ट्राची कन्या श्रद्धा चोपडे पदक जिंकण्यासाठी ग्लासगोला रवाना

Gang Rivalry Foiled: कृष्णा आंदेकरवरील गोळीबाराचा कट उधळला; नंदुरबारला जाताना पोलिस व्हॅनवर हल्ल्याची होती योजना

Shirur Temple Robbery: शिरूर जैन मंदिर दरोडा प्रकरणी तिघांना २५ महिन्यांचा कठोर कारावास; भाविकांत समाधान

SCROLL FOR NEXT