Tree planting at Chinchani village in Solapur District by mla subhash deshmukh 
सोलापूर

राज्यात वृक्षराजींचे गाव म्हणून "हे' येणार नावारुपास 

सकाळ वृत्तसेवा

पटवर्धन कुरोली (सोलापूर) : चिंचणी (ता. पंढरपूर) या गावाने सहा हजार झाडांची लागवड करुन श्रमदानातून संगोपन केले. आता आणखी एक हजार बांबूची लागवड केल्याने भविष्यात चिंचणी हे गाव राज्यात झाडांचे गाव म्हणून नावारूपाला येईल, असे मत आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले. 
चिंचणी येथे एक हजार बांबूची लागवड जिल्हा पुनर्वसन विकास निधीतून खोदलेल्या विहिरीचे पाणीपूजन, शाळा खोल्यांचे भूमिपूजन आमदार देशमुख यांच्या हस्ते झाले. आमदार देशमुख यांनी चिंचणी ग्रामस्थांनी पिराची कुरोली सारख्या माळावर येऊन प्रति महाबळेश्वर निर्माण करण्याची मनाशी बांधलेली जिद्द वाखाणण्याजोगी आहे. या ठिकाणी सातारासारखी पाण्याची परिस्थिती नसतानाही तब्बल श्रमदानातून सहा हजार झाडे लावली. त्याचे संगोपन केले. प्राणी, पक्षी, पर्यावरण रक्षणासाठी त्यांनी चालविलेली चळवळीला भविष्यात सोलापूर फाऊंडेशन व राज्य, केंद्र सरकारच्या स्तरावरून लागेल ती मदत करण्यासाठी आपण तयार असल्याचे सांगितले. 

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्‍लिक करा 
अनेक गावे झाडे लावणे व ती जगविण्यास उदासीन असतात. चिंचणीकर मात्र अवघे काही दिवस लोटले की गावात नवीन झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतात. आताही त्यांनी माझ्या हस्ते तब्बल एक हजार बांबूच्या झाडांची लागवड केली आहे. राज्यातील हे एकमेव गाव असेल की त्यांनी स्वखर्चातून लागवड आणि संगोपनाची जबाबदारी घेतली आहे, असे गौरवोद्गार आमदार देशमुख यांनी काढले. यावेळी जिल्हा पुनर्वसन विभागातून मंजूर झालेल्या निधीतून खोदलेल्या विहिरीच्या पाण्याद्वारे ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. शिवाय शाळा दुरूस्तीसाठी पुनर्वसन गावांना निधी मिळत नव्हता. मात्र त्यासाठीही निधी उपलब्ध झाल्याने शाळेची सोय होणार आहे. यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी चिंचणी स्मशानभूमीत लागवड केलेल्या झाडांचे कौतुक केले. यावेळी मुंबई म्हाडाचे अधिक्षक अभियंता सुनील ननवरे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राजकुमार पाटील, श्रमिक मुक्तीदलाचे जिल्हाध्यक्ष मोहन अनपट, शशिकांत सावंत, चंद्रकांत पवार, शरद सावंत, नितीन कापसे, अमोल जाधव, सिद्धेश्वर देशमुख, मच्छिंद्र पवार, तुकाराम घोरपडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT