Tribute from Sharad Pawar after the death of MLA Bharat Bhalke 
सोलापूर

आमदार भारत भालके यांचे अकाली निधन चटका लावणारे : शरद पवार

अशोक मुरुमकर

अहमदनगर : पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी (ता. २७) रात्री साडेआकराच्या दरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने सवर्त्र हळहळ व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ट्विट करुन भालके यांच्या निधनानंतर श्रद्धांजली अर्पण केली आहे.

पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार भारत भालके यांचे अकाली निधन चटका लावणारे आहे. त्यांच्या जाण्याने पंढरपूर तालुक्याचे कार्यकुशल व लोकाभिमुख नेतृत्व हरपले. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहवेदना व्यक्त करतो. भावपूर्ण श्रद्धांजली! 
आमदार भालके हे पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात सलग तीन वेळा निवडून आले.

गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना संसर्गाचा त्रास होऊ लागल्याने पुण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथून त्यांना डिसचार्ज मिळाल्यावर काही दिवसांनी त्यांना पुन्हा त्रास जाणवू लागल्याने पुणे येथे त्यांच्यावर उपचार केले जात होते. काही दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. 

गेल्या काही वर्षांपासून आमदार भालके यांना किडनीचा त्रास होत होता. मुंबईतील डॉक्‍टरांकडे ते तपासणीसाठी जात असत. काही दिवसांपूर्वी त्यांना संसर्गाचा त्रास जाणवू लागल्याने ते स्वतः पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. तेथून बरे होऊन एक दिवस ते पंढरपूरलाही आले होते; परंतु त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने शुक्रवारी दुपारी शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आदींनी हॉस्पिटलमध्ये जाऊन भालके यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: ''...कारण आम्ही भटके आहोत'', बंजारा-वंजारा वादावरुन धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण

Latest Marathi News Updates : ओबीसींचा बॅकलॉग तातडीने भरावा; सरकारचा जीआर वादग्रस्त – छगन भुजबळ

IND A vs AUS A: १९ वर्षाच्या पोराने भारतीय गोलंदाजांना झोडले, लखनौमध्ये शतक; श्रेयसचं नशीब महाराष्ट्राच्या पठ्ठ्याने त्याला OUT केले

Agricultural News : कमी खर्चात लाखोंचे उत्पन्न: इगतपुरीचे शेतकरी बांबू लागवडीकडे वळले

"यांचे अजून बारा वाजले नाहीत का ?" उपमुख्यमंत्र्यांच्या बैठीकीनंतरही रस्त्याची परिस्थिती जैसे थे ! चेतना भट्टच्या नवऱ्याचा संताप

SCROLL FOR NEXT