sunflower sakal
सोलापूर

सूर्यफूल बियाणांच्‍या दरात तिपटीने वाढ

उत्‍पन्नापेक्षा खर्च वाढण्‍याच्‍या भीतीने शेतकऱ्यांत नाराजी; उत्‍पादक कंपन्‍यांवर हवे नियंत्रण

सकाळ वृत्तसेवा

भोसे - खरीप हंगामाला सुरवात होते न होते तोच सूर्यफूल बियाणांचे उत्‍पादन करणाऱ्या बहुतांश कंपन्यांनी गतवर्षीपेक्षा यंदा बियाणांच्‍या दरात थेट दीडशे टक्के वाढ केली आहे. त्‍यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. हे बियाणे खरेदी कसे करायचे असा प्रश्‍‍न शेतक‍‍ऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. मान्सूनपूर्व पावसाने मंगळवेढा तालुक्‍याच्या दक्षिण भागात समाधानकारकरीत्या हजेरी लावल्‍याने शेतकऱ्यांमध्‍ये गावोगावी सध्या पेरणीची धांदल उडाली आहे. सूर्यफूल व बाजरीचा पट्टा म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंगळवेढा दक्षिण भागामध्‍ये सध्या शेतकरी वर्ग बियाणे शोधत दुकानांमध्‍ये गर्दी करीत आहे.

सूर्यफुलाच्या बियाणे निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी दोन किलोच्या प्रति पिशवी मागे गतवर्षीपेक्षा सरासरी दीडशे टक्के दरवाढ केली आहे. सूर्यफुलाच्या चांगल्या प्रतीच्या वाणची किंमत तीन हजार रुपये प्रति दोन किलो पिशवी अशी झाली आहे. सूर्यफूल बियाणाचा दर एका क्विंटल साठी दीड लाख रुपये झाला आहे. एका एकरासाठी दोन किलो बियाणे शेतकऱ्याला लागते. त्याला ३ हजार रुपये मोजावे लागतात. एक एकर मशागतिसाठी ४ हजार रूपये, पेरणीसाठी एक हजार, कोळपणीसाठी एक हजार, काढणीस ५ हजार, पिकांना पाणी देण्‍यास २ हजार रूपये मजुरी असा एकूण १५ ते १६ हजार एकरी खर्च येतो.

पाऊस कमी पडला तर सूर्यफुलाचे पीक जळून जाते. जास्त झाला तर फुलोरा झडून पोकळ होते आणि पीक चांगले आले तर याला बाजारपेठेत निश्चित असा हमीभाव नसल्याने गावोगावी सूर्यफूल खरेदीसाठी दुकाने मांडून व्यापारी मनमानी दराने खरेदी करतात. गेल्या वर्षी १२०० रुपयांला मिळणाऱ्या दोन किलोच्या सूर्यफूल बियाणे पिशवीची किंमत थेट ३ हजार रुपये झाल्‍याने आता बियाणे खरेदी करायचे कसे व शेती कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावती शिक्षकमध्ये महायुतीतच मोठी बंडखोरी, भाजपच्या तीन नेत्यांचे अर्ज; रवी राणांचाही पक्ष रिंगणात

Harmanpreet Kaur : हरमनप्रीत कौरने तडकाफडकी कर्णधारपद सोडलं! म्हणाली, संघासाठी रक्ताचे पाणी केले, पण...; आता नवी कॅप्टन कोण?

Content Creator Earning: ₹60 हजारांच्या नोकरीला बाय-बाय! फक्त 14 हजार फॉलोअर्सवर महिन्याला कमावते ₹1.12 लाख

दुरुस्तीवेळी अचानक सुरू झाला बॉयलर, २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू; सुरक्षा साधनांच्या अभावामुळे दुर्घटनेचा नातेवाईकांचा आरोप

Marathi News Live Updates: दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा पोलिसांनी अडवला; राहुल गांधी बॅरिकेडवर चढल्याने आंदोलनाला वेगळे वळण

SCROLL FOR NEXT