dagine kharedi.jpg 
सोलापूर

गुरुपृष्यामृतासाठी दागिने खरेदीची उलाढाल एक कोटीवर 

प्रकाश सनपूरकर

सोलापूरः बाजारपेठेत आज गुरूपृष्यामृताच्या मुहुर्तावर सोने व चांदी खरेदीमध्ये एक कोटी रुपयापेक्षा अधिक उलाढाल झाली. सराफा दुकानामध्ये मोठया प्रमाणात ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. लग्नसराईमुळे ग्राहकी वाढली आहे. . 

संपत्या इंग्रजी वर्षातील गुरुपृष्यामृताचे हे शेवटे मुहूर्त होते. मागशिर्ष महिन्यातील लक्ष्मी व्रताचा गुरुवार व लग्नसराई या दोन्ही कारणामुळे महिलांचा दागिने खरेदीकडे अधिक ओढा होता. मागील काही गुरुपृष्यामृताचे मुहुर्त कोरोनाच्या सावटाखाली वाया गेले होते. मात्र आज ग्राहकांनी खरेदीमध्ये जोरदार सहभाग घेतला. सोन्याचे व चांदीच्या भावात मागील काही दिवसापासून मोठे चढउतार नाहीत. 
लग्नसराईचा खरा फायदा सराफा बाजाराला झाला आहे. विवाह सोहळ्यात उपस्थितीच्या मर्यादेमुळे खर्चाच्या रकमेत बचत झाली आहे. त्यामुळे त्या ऐवजी दागिने खरेदीला अधिक महत्व दिले जात आहे. त्यामुळे सराफा बाजारात खऱ्या अर्थाने तेजी आली आहे. कोरोना संकटानंतर झपाट्याने या बाजारातील उलाढाल वाढली आहे. 

आजचे भाव 
सोने ः 50 हजार 650 रुपये प्रती तोळा 
चांदी ः 69 हजार रुपये किलो 

बाजारात ग्राहकी वाढली
लग्नसराईमुळे सराफा बाजारात ग्राहकी वाढली आहे. संपत्या वर्षातील हे शेवटचे गुरपृष्यामृत असल्याने महिलांची खरेदीसाठी अधिक गर्दी आहे. 
- मिलिंद येणेगूरकर, सराफा व्यावसायिक  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अशोक खरातच्या मुलाला SITने घेतलं ताब्यात, पत्नी फरार; गेट बंद असल्यानं कंपाऊंडवरून पथक घुसले घरात

Malegaon News : विलंबाचा फटका प्रशासनाला; बारामतीत शेतकऱ्यांच्या बाजूने उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

डोळ्यात अंगार अन् उरात स्वाभिमान! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; त्या व्यक्तीवर खिळली प्रेक्षकांची नजर

महिला कर्मचाऱ्याकडून शारीरिक संबंधांची मागणी, कामावरून काढण्याची धमकी अन्...; KDMC तील वरिष्ठ लिपीकावर गुन्हा दाखल

आणि डॉ. काशिनाथ घाणेकर सिनेमातील सुलोचना ताई नाही तर या भूमिकेसाठी सोनाली होती आग्रही ; म्हणाली..

SCROLL FOR NEXT