pm narendra modi 
सोलापूर

मोदी सरकार अर्रार्र ! पंतप्रधान आवास योजनेतील 20 लाख कुटूंब बेघरच 

तात्या लांडगे

सोलापूर : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत राज्यातील शहरांमधील झोपडपट्टीसह अन्य एकूण 21 लाख बेघरांना मार्च 2022 पर्यंत हक्‍काचा निवारा देण्याचे नियोजन राज्य सरकारने केले. तत्पूर्वी, 16 लाख घरकुलांना केंद्राने मंजुरी दिली, मात्र त्यापैकी मागील सहा वर्षांत विविध अडचणींमुळे फक्‍त एक लाख 10 हजार घरांचीच कामे सुरु असल्याची माहिती आवास योजनेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. 


केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर त्यांनी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शहरांमधील 21 लाख बेघरांपैकी 15 लाख घरकुलांना मंजुरी दिली. मात्र, कधी निधीची अडचण तर कधी लाभार्थ्यांचा निरुउत्साहामुळे ही योजना मागे पडल्याचे चित्र आहे. झोपडपट्टीधारकांसाठी स्वतंत्र योजनेअंतर्गत अर्पाटमेंट स्वरुपात घरे बांधून दिली जात आहेत. मात्र, मुंबई, पुणे वगळता अन्य शहरांमधील झोपडपट्टीधारकांनी या योजनेकडे पाठ फिरवित स्वतंत्र घरांची मागणी केली असून अनुदान वाढविण्याचीही मागणी केली आहे. दरम्यान, सोलापुरातील राज्यातील सर्वात मोठ्या 30 हजार घरांच्या रे नगर प्रकल्पाला राज्य सरकारने 40 कोटींचा हिस्सा दिला आहे. आता केंद्र सरकारने 38 कोटींचा हिस्सा मंजूर केला असून पुढील आठवड्यात तो निधी लाभार्थ्यांना वितरीत केला जाणार आहे. दरम्यान, सोलापूर, नागपूर, पुणे, कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यांमधील वाळूचे लिलाव पर्यावरण विभागाच्या मंजुरीत अडकल्याने घरकूल योजनेसाठी वाळूच मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यावर केंद्र अथवा राज्य सरकारकडून अद्यापही तोडगा निघाला नसल्याने मोदी सरकारची आवास योजना कागदावरच फुगल्याचे पहायला मिळत आहे. 


राज्यातील घरकुलांची सद्यस्थिती 
एकूण बेघर 
21.37 लाख 
मंजूर घरकूल 
16 लाख 
मंजुरीसाठी घरकुलांचा प्रस्ताव 
5.37 लाख 
बांधकाम सुरु अन्‌ पूर्ण घरे 
1.10 लाख 


वाळूच्या तुटवडा अन्‌ लाभार्थींच्या नकारामुळे रखडली योजना 
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत राज्यातील शहरांमधील 21 लाख बेघर लाभार्थ्यांना मार्च 2022 पर्यंत घरकूल देण्याचे उद्दिष्टे असून आतापर्यंत 16 लाख घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. त्यामध्ये झोपडपट्ट्यांमधील तीन लाख लाभार्थी असून मुंबई, पुणे वगळता अन्य शहरांमधील झोपडपट्टीधारकांनी अर्पाटमेंटच्या घरांना नकार दशविला आहे. झोपडपट्टी वगळता शहरातील अन्य 13 लाखांपैकी 40 हजार लाभार्थींच्या घरांचे काम सुरु झाले असून बहूतांश घरकुलांना वाळूचा तुटवडा जाणवत आहे. 
- दिलीप मुगळीकर, कार्यकारी अभियंता, पंतप्रधान आवास योजना, महाराष्ट्र 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Rate Today: सोनं-चांदीच्या भावात मोठी घसरण! 11 सप्टेंबरला पुन्हा दर कोसळणार? जाणून घ्या ताजी अपडेट

‘त्याला माझी इनसिक्युरिटी वाटायची’; अनेक वर्षांनंतर नीना गुप्तांनी उघड केलं गुपित, म्हणाल्या...'माझ्यापेक्षा जास्त...'

ChatGPT's 80s Photo Trend: Instagram वर व्हायरल होतोय 'ChatGPT ’80s Photo Trend'; 'हा' सोपा प्रॉम्प्ट वापरून तयार करा तुमचा ८० च्या दशकातील रेट्रो लूक!

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Share Market Today: इराणच्या अमेरिकेला धमकीने शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 500 अंकांनी खाली; कोणत्या शेअर्सला मोठा फटका?

SCROLL FOR NEXT