download (1).jpg 
सोलापूर

अडीच लाख शासकीय पदे रिक्‍त ! वरिष्ठ अधिकाऱ्यांची शासनाला स्मरणपत्रे; शासकीय योजना रखडल्या

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्हा परिषदेतील विविध विभागांमध्ये वर्ग एक व दोनमधील एक हजार 250 पदे रिक्‍त झाली आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामकाज करताना आणि नागरिकांचे प्रश्‍न सोडविताना, शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावाणी करताना प्रभारी अधिकाऱ्यांवर ताण येत आहे. या पार्श्‍वभूमीवर ही रिक्‍तपदे तत्काळ भरावीत, असे विनंतीपत्र मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी शासनाला व पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना दिले आहे. मात्र, त्यानुसार काहीच कार्यवाही न झाल्याने जिल्हा परिषदेने आता शासनाला स्मरणपत्र दिले आहे.

झेडपीच्या 142 शाळा मुख्याध्यापकांविना 
सोलापूर जिल्हा परिषदेच्या साडेतीन हजारांहून अधिक शाळा आहेत. खासगी शाळांच्या तुलनेत झेडपी शाळांची पटसंख्या कमी होऊ लागली असून त्याठिकाणी दर्जा सुधारण्याची गरज आहे. मात्र, या शाळांमध्ये 596 शिक्षकांची पदे रिक्‍त असून त्यात विज्ञान, गणित, इंग्रजी या विषयांच्या शिक्षकांची सर्वाधिक संख्या आहे. दुसरीकडे 142 शाळांना मुख्याध्यापकच नाहीत, अशी विदारक स्थिती आहे. तरीही रिक्‍तपदांची भरती होत नसल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. 

केंद्र व राज्य सरकारच्या घरकुल योजनांची अंमलबजावणीसह ग्रामीण विकासासंबंधीच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागास संचालक नाही. तर कुर्डूवाडी, मंगळवेढा, सांगोला, मोहोळ व बार्शी या पंचायत समित्यांमध्ये सहायक गटविकास अधिकारीच नाहीत. बालविकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शालेय पोषण आहार अधीक्षक, उपशिक्षणाधिकारी, पशुधन विकास अधिकारी, सहायक जिल्हा आरोग्याधिकारी, वैद्यकीय अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागाचा उपअभियंता, बांधकाम विभागात नऊ उपअभियंते, नऊ जलसंधारण अधिकाऱ्यांची पदे रिक्‍त आहेत. विशेष म्हणजे कोरोनाचे सावट अद्याप संपलेले नसतानाही जिल्ह्याला साथरोग वैद्यकीय अधिकारी मिळू शकला नाही. अधिकाऱ्यांच्या तथा शासकीय वाहनांना 21 वाहनचालक नाहीत. आरोग्यसेवक, आरोग्यसेविकांची 156 पदे रिक्‍त झाली आहेत. पाच औषण निर्माण अधिकारी, 21 आरोग्य पर्यवेक्षकांची पदेही रिक्‍त आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील पदभरतीस वित्त विभागाने मान्यता देऊनही सोलापूर जिल्हा परिषदेतील याच विभागातील तब्बल पाचशे पदे रिक्‍त असूनही भरती प्रक्रिया सुरु झालेली नाही, हे विशेष. 

झेडपीतील रिक्‍तपदांचा घोषवारा... 
प्राथमिक शिक्षक : 596 
मुख्याध्यापक : 142 
आरोग्य कर्मचारी : 405 
पशुधन विकास अधिकारी : 41 
बांधकामसह अन्य विभाग : 189 
एकूण : 1,250 

रिक्‍तपदे भरण्याची आहे गरज 
जिल्हा परिषदेतील महत्त्वाच्या विभागांमधील पदे रिक्‍त झाली आहेत. मागील काही वर्षांत वर्ग एक व वर्ग दोनची पदे भरली गेली नाहीत. त्यामुळे शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसह प्रशासकीय कामकाज करणे सोयीचे व्हावे म्हणून ही पदे तत्काळ भरावीत, असे पत्र शासनाला पाठविले आहे. 
- दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर जिल्हा परिषद 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT