bus (1) - Copy.jpg 
सोलापूर

लोहाऱ्यातून 30 हजार घेऊन दोन मुले सोलापूरमार्गे पुण्याला जात होते पळून पण...

तात्या लांडगे

सोलापूर : वहिनी गाणगापूरला निघणार होती, त्यामुळे सोलापूर एसटी स्टॅण्डवरून कर्नाटकला जाणारी एसटी कधी जाते, याची माहिती घेण्यासाठी बालकल्याण समितीच्या अध्यक्षा अनुजा कुलकर्णी सोलापूर एसटी स्टॅण्डवर गेल्या. एसटीची चौकशी करीत असतानाच त्यांच्यापुढे दोन लहान मुले उभी होती. काहीवेळापूर्वी एक हजार रुपये देऊन शिवशाही बसची तिकीटे त्यांनी काढली होती. त्यानंतर ते दोघेही शिवशाहीचे तिकीट रद्द करुन आताचे तिकीट द्या, अशी मागणी करीत होते. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने कुलकर्णी यांनी त्या दोघांना हटकले आणि पुढील अनर्थ टळला.

सांयकाळचे सहा वाजले (मंगळवारी) होते. कोरोनामुळे एरव्ही गजबजलेले एसटी स्थानकावर मोजकेच प्रवासी होते. काउंटरवर वाहतूक नियंत्रक म्हणून मते ड्यूटीवर होत्या. त्यांनी त्या मुलांना तिकीट रद्द करु नका, पाचशे रुपये कपात होतील, असे सांगितले. मात्र, अनुजा कुलकर्णी यांनी संशयास्पद प्रकार पाहून मुलगा श्रेयसला बोलावून घेतले. त्या दोघांनी लोहाऱ्यावरून (जि. उस्मानाबाद) पळून आलेल्या दोन्ही मुलांकडे विचारपूस केली. त्यावेळी त्यांनी आमच्याकडे सहा हजार रुपये असल्याचे सांगितले. श्रेयस यांनी थोडा दम देऊन विचारल्यानंतर त्यांच्याकडे 29 हजार 991 रुपये निघाले. मुलांकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्यातील एक मुलगा उस्मानाबाद येथे नववीत शिक्षण घेत असून दुसरा गुराखी असल्याचे समजले. बालकल्याण समितीच्या अध्यक्षा कुलकर्णी यांनी त्याच्या पालकांना दूरध्वनी करुन हकीकत सांगितली. तत्पूर्वी, लोहारा पोलिस ठाण्याशी संपर्क करुन माहिती देण्यात आली. त्यानुसार त्यांनी दोन्ही मुलांच्या पालकांना सांगून सोलापूरला जाण्यास सांगितले. रात्री 11 वाजता पालक त्याठिकाणी पोहचले. त्यानंतर त्या मुलांना पालक गावी घेऊन गेले. दोन्ही मुले पुण्याला जाणार होते. मात्र, अनुजा कुलकर्णी यांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळल्याने पालकांनी त्यांचे आभार मानले.


लहान मुलांना तिकीट दिलेच कसे ?
कोरोना काळात परजिल्ह्यातून सोलापूर एसटी स्थानकावर दोन मुले आली होती. त्यांनी शिवशाहीची पुण्याला जाण्यासाठी दोन तिकीटे काढली. या मुलांसमवेत पालक नसतानाही आणि विशेष म्हणजे दोन्ही मुले अल्पवयीन असतानाही त्यांना तिकीटे दिलीच कशी, हा प्रश्‍न उपस्थित केला जाऊ लागला आहे. बालकल्याण समितीच्या अध्यक्षा अनुजा कुलकर्णी त्याठिकाणी गेल्या नसत्या तर दोन्ही मुले बेपत्ता झाली असती, अशीही चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिवाळी अधिवेशानात राज्यात लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीसांनी दिली मोठी अपडेट, काय म्हणाले?

Mohol Ganeshotsav : मोहोळ शहरात गणेश मूर्ती खरेदीसाठी मोठी गर्दी, गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट गणेश मूर्तीच्या किमती वाढल्या

Marathi News Live Updates : मनोज जरांगे आझाद मैदानावर उपोषणावर ठाम; १८ सप्टेंबरसाठी पोलिसांकडे परवानगीचा अर्ज

Moon Venus Conjunction Sky Event: चंद्रकोरीसोबत तेजस्वी शुक्राची दुर्मीळ युती; निरभ्र आकाशात नयनरम्य खगोलीय नजारा

Pune News : महापालिकेचे अधिकाऱ्यांना उतरावे लागणार रस्त्यावर; दर शुक्रवारी अहवाल सादर करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT