Two deaths of corona in one day in Solapur 
सोलापूर

धक्कादायक! सोलापुरात कोरोनाने एका दिवसात घेतला दोन महिलांचा बळी; संख्या 135

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात आज एकाच दिवशी दोन कोरोना बाधित महिलांचा मृत्यू झाला आहे. आज एका दिवसात सात जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने सोलापुरातील एकूण कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या 135 झाली आहे. एकाच दिवशी दोन महिलांचा मृत्यू झाल्याने सोलापूर जिल्ह्यात कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींची संख्या आठ झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 
मोहोळ तालुक्यातील पाटकुल-पेनुर येथील 26 वर्षीय महिलेला 24 एप्रिल रोजी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 26 एप्रिल रोजी या महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. उपचारादरम्यान तीन मे रोजी रात्री अकरा वाजता या महिलेचे निधन झाले आहे. आज मृत पावलेली दुसरी महिला ही 65 वर्षांची असून ती सोलापुरातील न्यू पाच्छा पेठ परिसरातील आहे. तीन मे रोजी दुपारी बारा वाजता या महिलेला सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात गंभीर स्थितीत दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान अवघ्या एक तासात या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेची कोरोना चाचणी घेण्यात आली असून आज सकाळी या महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचीही माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. सोलापुरात आज नव्याने आढळलेल्या सात कोरोना बाधित रुग्णांमध्ये नइ  जिंदगी परिसरातील दोन महिला, शास्त्रीनगर परिसरातील एक महिला, न्यू पाच्छा पेठ परिसरातील एक महिला, सोलापूर जवळील देगाव येथील एक पुरुष, गेंट्याल चौका समोरील भगतसिंग मार्केट जवळील एक पुरुष व सोलापुरातील जोडभावी पेठेतील एका पुरूषाचा समावेश आहे. सोलापुरात एकूण कोरोना बाधित व्यक्तींची संख्या 135 झाली  असून आजपर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये तीन पुरुष व पाच महिलांचा समावेश आहे. रुग्णालयात सध्या 105 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. कोरोनावर मात करुन बरे  होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या बावीस असल्याची माहितीही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. आयसोलेशन वार्डातील 2258 जणांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन हजार तीन जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. अद्यापही 255 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. प्राप्त झालेल्या 2003 अहवालातील एक हजार 868 अहवाल निगेटिव्ह आहेत तर 135 अहवाल पॉझिटिव्ह आहेत. आज दिवसभरात 116 अहवाल प्राप्त झाले असून त्यातील 109 अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. सात अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यामध्ये दोन पुरुष पाच महिला व एका मृत  महिलेचा समावेश आहे. आज दिवसभरात कोरोना मुक्त होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या तीन आहे अशी माहितीही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT